प्रियांका चोप्रा-जोनासने का बदललं नाव? अखेर समोर आलं महत्त्वपूर्ण कारण, जाणून घ्या…

ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या एका नवीन कारणामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावरून पतीचे आडनाव अर्थात 'जोनास' काढून टाकल्यानंतर, त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चांगलीच खळबळ उडवली होती.

प्रियांका चोप्रा-जोनासने का बदललं नाव? अखेर समोर आलं महत्त्वपूर्ण कारण, जाणून घ्या...
Priyanka-Nick
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 1:07 PM

मुंबई : ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या एका नवीन कारणामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावरून पतीचे आडनाव अर्थात ‘जोनास’ काढून टाकल्यानंतर, त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चांगलीच खळबळ उडवली होती. प्रियांका तिचा पती निक जोनासपासून घटस्फोट घेत आहे, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्याचवेळी तिची आई मधु चोप्रा हिने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. आता प्रियांकाने नाव बदलण्यामागचे कारण समोर आले आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा आता तिच्या नावाचे स्पेलिंग देखील बदलू शकते. प्रियांका ज्योतिष क्रमांकानुसार तिचे नाव बदलणार असून, आता प्रियंका असे लिहिणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रियांका चोप्राला दीर्घकाळापासून हरवलेले तिचे ग्लॅमर प्रसिद्धी परत मिळवायची आहे. मागील काही काळापासून प्रियांकाला मनोरंजन विश्वात अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे कदाचित तिने आता नाव बदलण्याचा सल्ला मनावर घेण्याचा निर्णय घेतला असावा, असे म्हटले जात आहे.

जोनासच नाही तर चोप्राही काढलं!

अलीकडेच प्रियांकाने तिच्या नावातून चोप्रा आणि जोनास ही दोन्ही नावं काढून टाकली आहेत. यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाला आता जगभरात तिला फक्त तिच्या नावाने ओळखले जावे असे वाटते आहे. त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हे पाऊल त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यासाठी चांगले ठरणार आहे. माध्यमांच्या अहवालांवरवर विश्वास ठेवला तर, प्रियांका चोप्रा आणि निक त्यांच्या लग्नामुळे खूप आनंदी आहेत आणि हे जोडपे आता फॅमिली प्लानिंग करत आहे.

घटस्फोटाच्या अफवेवर प्रियांकाने लावला पूर्णविराम!

निक आणि प्रियांकाच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जगभरात खळबळ उडाली असतानाच, निक जोनासने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यावर प्रियांकाने खास कमेंट करून अशा अफवा उडवणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावले. या व्हिडीओमध्ये निक जिममध्ये व्यायाम करताना दिसला. त्याच्या या व्हिडीओवर प्रियांकाने गोड कमेंट केली.

आता प्रियांकाच्या या कमेंटवरून हे स्पष्ट झाले आहे की, हे जोडपे अजूनही एकमेकांच्या प्रेमात आणि लग्नात आहेत. नुकताच प्रियांकाने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात ती आणि निक दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘जोनास असल्याचे फायदे..’, असे लिहिले आहे. त्यामुळे आता सारं काही आलबेल असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा :

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आगळं वेगळं प्री-वेडिंग, शिर्के-पाटील कुटुंब रंगलं रेट्रो रंगात!

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला! कुशल बद्रिकेच्या साथीने भाऊ कदम करणार प्रेक्षकांचे मनोरंजन