बेडरुममध्ये मुलासोबत होती जान्हवी कपूर, वडिलांनी पकडल्यानंतर… खुद्द अभिनेत्री सांगितला ‘तो’ किस्सा

Janhvi Kapoor: बेडरुमध्ये मुलासोबत लेकीला पाहताच भडकले बोनी कपूर, जान्हवी दिली शिक्षा, खुद्द अभिनेत्री सांगितला 'तो' किस्सा... जान्हवी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत

बेडरुममध्ये मुलासोबत होती जान्हवी कपूर, वडिलांनी पकडल्यानंतर... खुद्द अभिनेत्री सांगितला तो किस्सा
| Updated on: Jan 28, 2025 | 2:47 PM

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत जान्हवी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता जान्हवी ‘परम सुंदरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात जान्हवी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. त्यामुळे दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. तर जान्हवीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.

एका मुलाखतीत जान्हवीने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. एकदा जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी लेकीला एका मुलासोबत बेडरुममध्ये पकडलं होतं. त्यानंतर बोनी कपूर यांनी रागात जान्हवीला शिक्षा देखील दिली होती.

जान्हवी कपूर म्हणाली, ‘जेव्हा आम्ही जुन्या घरात राहात होतो. तेव्हाची गोष्ट आहे. मी माझ्या एका मित्राला घरी बोलावलं होतं. तेव्हा घरी कोणीच नव्हतं. आम्ही दोघं बेडरुममधून बसून गप्पा मारत होतो. तेव्हा पप्पा घरी आहे. तेव्हा काय करायचं मला काहीच कळलं नाही. अशात मी त्याला दरवाजातून नाही तर खिडकीतून जाण्यास सांगितलं.’

‘मला असं वाटलं पप्पांना काही माहिती होणार नाही. पण सीसीटीव्हीमध्ये त्यांनी सर्वकाही पाहिलं होतं. तेव्हा त्यांनी मला शिक्षा दिली होती आणि घरातील सर्व खिडक्यांना ग्रील लावल्या…’ असं जान्हवीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

जान्हवी कपूर हिचे आगामी सिनेमे

जान्हवी कपूर हिने तिच्या करियरची सुरुवात ‘धडक’ सिनेमातून केली. त्यानंतर जान्हवीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज जान्हवीला कोणत्या ओळखीची गरज नाही. आता जान्हवी लवकरच अभिनेता वरुण धवन याच्यासोबत ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ सिनेमात दिसणार आहे. चाहते देखील तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

जान्हवीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री शिखर पहाडिया याला डेट करत आहे. दोघांनी अद्याप त्यांचं नांतं अधिकृत रित्या घोषित केलं नाही. पण दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येतं. कोणत्याही कार्यक्रमात शिखर आणि सारा एकत्र दिसतात.