AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थिएटरमध्ये ‘या’ वेळेत 16 वर्षांखालील मुलांना एन्ट्री बॅन, उच्च न्यायालयाचे आदेश

थिएटरमध्ये 16 वर्षांखालील मुलांना घेऊन जाताय, तर जाणून घ्या मुलांसाठी नवी वेळ... मुलांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाचे सुनावले आदेश

थिएटरमध्ये 'या' वेळेत 16 वर्षांखालील मुलांना एन्ट्री बॅन,  उच्च न्यायालयाचे आदेश
| Updated on: Jan 28, 2025 | 2:04 PM
Share

आधी कोणत्याही वेळेत 16 वर्षांखालील मुलांना थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी कोणतेही नियम नव्हते. पण आता 16 वर्षांखालील मुलांना सिनेमा ठराविक वेळेत दाखवता येणार आहेत. तेलंगणा उच्च न्यायालयाने 16 वर्षांखालील मुलांना थिएटर, मल्टिप्लेक्समध्ये सकाळी 11 वाजण्यापूर्वी आणि रात्री 11 नंतर सिनेमा पाहण्यास बंदी घातली आहे.सिनेमा तिकीट दरात वाढ आणि विशेष शोसाठी परवानग्यांसंबंधीच्या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

न्यायमूर्ती विजयसेन रेड्डी यांनी टिपणी केली की मुलांना सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा सिनेमा पाहण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आता सिनेमा पाहण्यासाठी मुलांना वेळेचं बंधन असणार आहे.

कोर्टाने काय सांगितलं?

‘पुष्पा 2’ सिनेमाच्या प्रिमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलाचा मृत्यू झाला तर, महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला… याच घटनेचा उल्लेख करत विजयसेन रेड्डी म्हणाले, ‘सिनेमॅटोग्राफीच्या नियमांनुसार, मुलांना सकाळी 8.40 च्या आधी आणि दुपारी 1.30 नंतर सिनेमा पाहण्याची परवानगी दिली जाऊ नये. मुलांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरा सिनेमा पाहू देऊ नये.’

चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्समध्ये 11 वाजण्यापूर्वी आणि रात्री 11 नंतर 16 वर्षांखालील मुलांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व पक्षांना द्यावेत, अशी शिफारस उच्च न्यायालयाने केली आहे. मुलांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला प्रधान सचिव, गृह विभाग यांना देण्यात आला.

शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर होतायेत वाईट परिणाम – कोर्ट

न्यायमूर्ती रेड्डी यांनी रात्री उशिरा स्क्रीनच्या अतिवापराचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली. याचिकाकर्त्यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. मध्यरात्री आणि सकाळी – सकाळी मुलांना सिनेमा पाहण्यास परवानगी दिल्यानंतर त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, विषम वेळेत सिनेमा पाहिल्यास मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. न्यायालयाने आपला निर्णय देण्यापूर्वी या समस्यांचा विचार केला. आता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Follow Us
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!