दुसऱ्या आठवड्यात ‘पठाण’च्या कमाईला ब्रेक ; 14 व्या दिवशी सिनेमाच्या गल्ल्यात इतकेच कोटी

बॉक्स ऑफिस 'पठाण' सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी, किंग खान याला पाहण्यासाठी सिनेमागृहात चाहत्यांची गर्दी... सिनेमाने १४ व्या दिवशी केली फक्त इतक्याच कोटी रुपयांचा कमाई

दुसऱ्या आठवड्यात पठाणच्या कमाईला ब्रेक ; 14 व्या दिवशी सिनेमाच्या गल्ल्यात इतकेच कोटी
Pathan Box Office collection
| Updated on: Feb 08, 2023 | 3:15 PM

Pathan Box Office collection : अभिनेता शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा भारतातच नाही तर, जगभरात नवे इतिहास रचत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक रेकॉर्ड रचताना दिसत आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमा कोट्यवधी रुपयांमध्ये कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाची कमाई कमी होत असली तरी, किंग खान याला पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात गर्दी करत आहेत. पठाण सलग १४ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कायम आहे. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाची कमाई सिंगल डिजिटमध्ये होत असली तरी पठाण सिनेमा चर्चेत आहे.

पठाण सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सिनेमाच्या १४ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ट्रेड विश्लेषक रमेश बाल यांनी जाहिर केलेल्या आकड्यांनुसार १४ व्या दिवशी सिनेमाने ७ ते ८ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. पण आता पठाण सिनेमाच्या कमाईला बॉक्स ऑफिसवर ब्रेक लागल्याचं चित्र दिसत आहे.

 

 

भारतात पठाण सिनेमाने जवळपास ४४६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर सिनेमा दुसऱ्या आठवड्यात ५०० कोटी रुपयांचा आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर जगभारात सिनेमाने जवळपास ८५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमा १ हजार कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल असं सांगण्यात येत आहे.

चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.

शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी घेतली. पण कोणत्याही सिनेमाचा पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमाने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले.