AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई’ किंवा ‘आंटी’ नाही… अर्जुन कपूर सावत्र आई श्रीदेवींना या नावाने हाक मारायचा; स्वत:च केला खुलासा

अर्जुन कपूर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याच्या सावत्र आई श्रीदेवींबद्दल प्रथम बोलताना दिसला. त्यावेळी त्याने श्रीदेवींबद्दल एक शब्द वापरला. त्याचं नावाने तो त्याच्या सावत्र आईला आजही संबोधततो.

'आई' किंवा 'आंटी' नाही... अर्जुन कपूर सावत्र आई श्रीदेवींना या नावाने हाक मारायचा; स्वत:च केला खुलासा
arjun kapoorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 27, 2025 | 1:06 PM
Share

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलतो. पण त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्याची चर्चा मात्र जास्त होताना दिसते. मग त्या चर्चा मलायका आणि त्याच्या नात्याबद्दल असो किंवा त्याच्या आणि त्याची सावत्र आई श्रीदेवीमधील नात्याची असो. दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीबद्दल तो कधी जास्त बोलताना कधीच दिसत नाही. तथापि, कधीकधी तो त्याच्या बहिणी आणि वडील बोनी कपूरबद्दल बोलताना दिसतो. परंतु, अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरने श्रीदेवीबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच अर्जुन श्रीदेवीला कोणत्या नावाने हाक मारत असे हे देखील त्याने सांगितले.

अर्जुन कपूरने ‘रूप की रानी चोरों का राजा’ वर भाष्य केलं

एका मुलाखतीत अर्जुन कपूरने ‘रूप की रानी चोरों का राजा’ वर भाष्य केलं. ज्याची निर्मिती अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी केली होती. या चित्रपटात त्याचे काका अनिल कपूर आणि सावत्र आई श्रीदेवी मुख्य भूमिकेत होती. तथापि,1993 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला, जरी त्याचे बजेट खूप मोठे असले तरी. त्या काळात या चित्रपटाचे बजेट सुमारे 10 कोटी होते.

अर्जुन कपूर काय म्हणाला?

या चित्रपटाबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, ‘माझ्या वडिलांसोबत माझे संपूर्ण आयुष्य ‘रूप की रानी चोरों का राजा’ च्या सेटवर गेले आहे. आजच्या मानकांनुसारही हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे. त्यावेळी या चित्रपटाचा खर्च 10 कोटी होता आणि त्यात अनिल चाचूसोबत ‘श्रीदेवी मॅडम’ आणि जग्गू दादा (जॅकी श्रॉफ) होते. त्यात अनुपम खेर यांनी खलनायकाची भूमिका केली होती. चित्रपटात अनिल चाचूसोबत एक कबुतर होते, जे त्यातील माझे आवडते पात्र होते.’

श्रीदेवीला याच नावाने अर्जुन हाक मारायचा

मुलाखतीत त्याने श्रीदेवीसाठी ‘मॅडम’ हा शब्द उच्चारल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. तसेच एका मुलाखतीत त्याने असंही म्हटलं होतं की, त्याचे श्रीदेवीसोबतचे त्याचे नाते प्रेमळ होते. अर्जुन म्हणाला होता की, ‘माझ्या वडिलांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाचा मी आदर करतो जसा तो मला हवा तसाच करतो. म्हणूनच मी त्यांचाही आदर करतो आणि कोणाविरुद्धही वाईट भावना मनात ठेवत नाही.’

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

1996 मध्ये बोनी कपूर मोना शौरीपासून वेगळे झाले

हा तो काळ होता जेव्हा बोनी कपूर श्रीदेवीला डेट करत होते, तर याच काळात त्यांचे मोना शौरी कपूरशी लग्न झाले होते आणि ते अर्जुन आणि अंशुला या दोन मुलांचे वडील होते. श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी बोनी कपूरने 1996 मध्ये अर्जुनची आई मोना शौरी यांना घटस्फोट दिला आणि त्याच वर्षी श्रीदेवीशी लग्न केले. मोना आणि बोनी कपूर यांचा घटस्फोट झाला तेव्हा अर्जुन कपूर 10 वर्षांचा होता आणि त्याची बहीण अंशुला 5 वर्षांची होती. पालकांच्या विभक्ततेचा अर्जुनवर खूप वाईट परिणाम झाला, ज्याबद्दल त्याने स्वतःही खुलासा केला आहे. सुरुवातीला अर्जुन त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या कुटुंबापासून म्हणजेच श्रीदेवी आणि तिच्या मुली जान्हवी आणि खुशीपासून अंतर ठेवत असे, परंतु 2018 मध्ये श्रीदेवीच्या निधनानंतर तो त्याच्या सावत्र बहिणींच्या जवळ आला आणि आता तो मोठ्या भावाप्रमाणे त्यांची पूर्ण काळजी घेताना दिसतो.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.