इतका अपमान सहनच केला नसता..; आलिया भट्टच्या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस

12 मे पासून 79 व्या 'कान फिल्म फेस्टिव्हल'ची सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अनोख्या अंदाजात पोहोचली. परंतु रेड कार्पेटवरील तिचा एक व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

इतका अपमान सहनच केला नसता..; आलिया भट्टच्या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस
Alia Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2026 | 8:15 AM

12 मे च्या संध्याकाळापासून 79 व्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ची सुरुवात झाली. दरवर्षी या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूक्सची जोरदार चर्चा असते. परंतु या वर्षी लॉरियल पॅरिसचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलिया भट्ट पोहोचली. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील आलियाचे विविध लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ तिच्या रेड कार्पेटवरील एण्ट्रीचा आहे. या व्हिडीओमध्ये आलिया अत्यंत आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर पोहोचते, परंतु त्यानंतर जे घडतं, ते पाहून नेटकरी प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. अशा प्रकारचा अपमान सहनच केला नसता, असं नेटकरी म्हणत आहेत.

रेड कार्पेटसाठी आलियाने पीच रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. लॉरियलची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने ऐश्वर्या राय बच्चनप्रमाणेच तीसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असेल, असं मानलं जात होतं. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं. आलिया रेड कार्पेटवर आली तरी फोटोग्राफर्सना तिची पर्वाच नव्हती. ते रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या दुसऱ्याच कोणाचे तरी फोटो काढण्यात व्यस्त होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडीओ-

‘खूपच लाजिरवाणं आहे हे, कान हे एक जागतिक मंच आहे आणि तिथे आलियाची दुसऱ्यांचा उपस्थिती आहे, तरीही तिला कोणी ओळखत नाही. एकाही पापाराझीने तिच्याकडे पाहिलं नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘ती कोणाला हात दाखवत आहे? कोणालाच तिच्याच रस दिसत नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वात मोठी कमतरता आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आलिया लक्ष वेधण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण तिला कोणीच ओळखत नाहीये. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर ‘भारतीय सेलिब्रिटी ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवतात, ते खूपच लाजिरवाणं आहे. इथे कानमधअये आलिया भट्टला कॅमेऱ्यात कैद करण्याची तसदीही एका कॅमेरामनने घेतली नाही’, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

दरवर्षी ऐश्वर्या कान फिल्म फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावते. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक लक्षवेधी ठरतो. संपूर्ण जगभरात तिच्या अनोख्या लूक्सची चर्चा होते. मात्र आलिया भट्टच्या बाबतीत हे घडताना दिसलं नाही.

Follow Us