
टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री नौशील अली सरदारने आपल्या एका जुन्या मुलाखतीत सेलिब्रिटी मॅचमेकर सीमा टपारिया यांच्यावर मोठे आरोप केले होते. माझ्या बहिणीने सीमा यांना फोन केलेला व माझ्यासाठी मुलगा शोधायला सांगितलेला असं नौशीन म्हणाली. पण मी मुस्लिम असल्याने सीमा यांनी माझ्यासाठी जोडीदार शोधायला नकार दिला असं आरोप नौशीनने इंटरव्यूमध्ये केलेला. आता या आरोपांवर सीमा टपारिया यांनी मौन सोडलं असून सत्य काय आहे ते सांगितलं. सीमा टपारिया नेटफ्लिक्सवरील शो ‘इंडियन मॅचमेकिंग’मुळे खूप लोकप्रिय झाली. बिग बॉस आणि बॉलिवूड वाइव्स सारख्या शो मध्ये सुद्धा सीमा दिसल्या होत्या. आता एका वेबसाइटशी बोलताना सीमा यांनी नौशीन अली सरदराच्या आरोपांवर उत्तर दिलय. ‘मी धर्मामुळे नौशीनसाठी मुलगा शोधायला नकार दिला नव्हता’ असं सीमा टपारिया यांनी सांगितलं.
धर्माच्या कारणावरुन नौशीनसाठी मुलगा शोधला नाही, या आरोपावर सीमा टपारिया म्हणाल्या की, “मॅचमेकिंग नशिबाचा भाग आहे. मी देव नाहीय. पाच वर्षांपूर्वी शो सुरु केला, त्यावेळी त्यांनी स्थळ शोधण्यासाठी माझ्याशी संपर्क केलेला. मी त्यावेळी म्हटलेलं की, मी त्या खास धर्मासाठी मॅचमेकिंग करत नाही. आता पाच वर्षानंतर ही गोष्ट कुठेतरी छापून आलीय. काही हरकत नाही. मला यामुळे प्रसिद्धी मिळाली. मी तर निष्पाप भावनेने नकार दिला होता”
मी ट्रोलिंगही एन्जॉय करते
नौशीन अलीच्या आरोपानंतर सीमा यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलेलं. “मी यामुळे मिळणाऱ्या फेमचा प्रत्येक क्षण एन्जॉय करतेय. माझ्यामध्ये कुठलाही अहंकार आलेला नाही. मी अनेक स्टार्सना भेटलीय. अनेक शोज मध्ये गेली आहे. न्यू जनरेशन माझी फॅन आहे. मी ट्रोलिंगही एन्जॉय करते. निगेटिव असो वा पॉझिटिव पब्लिसिटी चांगली असते. मग, मी कुठल्या गोष्टीसाठी घाबरु?. प्रत्येकजण माझ्याबद्दल चांगलं लिहिणार नाही” असं सीमा म्हणाल्या.
नौशीन कोणासोबत लग्नाला तयार होती?
43 वर्षीय नौशीनचा जन्म मुंबईत झाला. टेलीविजन शो कुसुम मधून तिला ओळख मिळाली. नौशीन कॅथलिक, शीख आणि पंजाबी बॅकग्राऊंडच्या व्यक्तीसोबत लग्न करायला तयार होती. पण प्रतिसाद मिळाला नाही.