Video: कथित गर्लफ्रेंडसोबत बसलेल्या युजवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयने विचारला प्रश्न, ती खुदकन हसली अन्…

Ind vs NZ Final: सध्या सोशल मीडियावर युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा रंगली आहे. तो सामना पाहण्यासाठी दुबईला गेला होता. त्याच्यासोबत कथित गर्लफ्रेंड देखील दिसली. दरम्यान, अभिनेता विवेक ओबेरॉयचा त्यांच्याशी संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video: कथित गर्लफ्रेंडसोबत बसलेल्या युजवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयने विचारला प्रश्न, ती खुदकन हसली अन्...
Yuzi and Vivek
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 10, 2025 | 1:48 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विजेतेपद पटकावताच संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला गेला. काही दिग्गज तर मैदानाताच डान्स करताना दिसले. दरम्यान, सोशल मीडियावर चर्चा रंगली ती टीम इंडियातून बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहलची. तो सामना पाहायला दुबईला गेला होता. त्याच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंड देखील दिसली. त्यांच्यासोबत बसलेला अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विवेक काय म्हणाला चला पाहूया…

युजवेंद्र चहल आणि त्याची कथीत गर्लफ्रेंड आरजे मैहवश जेथे सामना पाहायला बसले होते तेथे बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय देखील होता. विवेकने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामना पाहातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये न्यूझीलंडने भारताला धावांचं लक्ष्य दिल्यानंतर विवेक ओबेरॉयने युझवेंद्र चहलला भारत जिंकणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने नक्कीच! आरामात जिंकणार असे उत्तर दिले. ते ऐकून चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे मैहवश खुदकन हसली.

यापूर्वी देखील युजवेंद्र चहल आणि आरजे मैहवश यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते पाहून मैहवशने राग व्यक्त केला होता. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा सगळ्या अफवा असल्याचे सांगितले होते. आता त्यांना पुन्हा एकत्र पाहून युजवेंद्रच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

युजवेंद्र आणि धनश्री

काही दिवसांपूर्वीच युजवेंद्र चहल आणि डान्सर, कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. काही महिने डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाला एक महिना देखील झाला नाही. तर त्याचे नाव दुसऱ्या मुलीसोबत जोडले जात आहे. तो जवळची मैत्रिण मैहवशला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण दोघेही सतत एकत्र फिरताना दिसतात.