
Chhaava worldwide box office collection: अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात नवे विक्रम रचले आहे. दिवसागणिक सिनेमाच्या कमाईच्या अकड्यात मोठी वाढ होत आहे. भारतात सिनेमाने 300 कोटींचा आकडा पार केला आहे. पण 200 – 300 कोटी विसरा, जगभरातील सिनेमाची कमाई जाणून तुमच्याही भुवया उंचावतील. ‘छावा’ सिनेमाने जगभरात 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘छावा’ हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेला आहे. यामध्ये विक्की कौशलने मराठा योद्ध्याची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी प्राण फुंकले आहेत. त्याच्या दमदार कामगिरीचे खूप कौतुक होत आहे.
‘छावा’ सिनेमाने जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला होता. रिपोर्टनुसार, 10 दिवसांत ‘छावा’ सिनेमाने जगभरात 465.83 कोटींची कमाई केली आहे. सांगायचं झालं तर, 500 कोटींच्या क्लबमध्ये सिनेमा सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतातील ‘छावा’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 33.10 कोटींची कमाई केली. पहिल्या वीकेंडला ‘छावा’ने 121.43 कोटींचा व्यवसाय केला. पहिल्या आठवड्यात सिनेमाचं कलेक्शन 225.28 कोटी रुपये होते. सिनेमाने आतापर्यंत देशभरात 334.51 कोटींचा व्यवसाय केला आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’मध्ये अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यामध्ये अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका साकारली असून औरंगजेबाच्या भूमिकेतील त्याच्या जबरदस्त अभिनयाचे कौतुक होत आहे. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.