CID फेम अभिनेत्रीच्या पतीचं 15 महिन्यांच्या बाळासोबत धक्कादायक कृत्य; CCTV फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली

| Updated on: May 09, 2023 | 4:12 PM

शनिवारी तिने जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमनने बाळाला तीन वेळा जमिनीवर आदळल्याचं पाहिलं गेलं. या घटनेनंतर तिने अमनविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

CID फेम अभिनेत्रीच्या पतीचं 15 महिन्यांच्या बाळासोबत धक्कादायक कृत्य; CCTV फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली
Chandrika Saha
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : सीआयडी आणि ‘सावधान इंडिया’ यांसारख्या मालिकेत काम केलेली अभिनेत्री चंद्रिका सहाने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. 15 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आदळून जखमी केल्याचा धक्कादायक आरोप तिने पतीवर केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज सोपवण्यात आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट पहायला मिळत आहे की एक व्यक्ती लहान मुलाला बेडरुमच्या जमिनीवर आदळत आहे.

41 वर्षीय चंद्रिका साहाने ‘सीआयडी’, ‘सावधान इंडिया’ आणि ‘क्राइम अलर्ट’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चंद्रिकाचा पती 21 वर्षांचा असून अमन मिश्रा असं त्याचं नाव आहे. अमनविरोधात तिने बांगुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चंद्रिकाचा पती अमन त्यांच्या मुलावर खुश नव्हता, असं म्हटलं जातंय. 2020 मध्ये चंद्रिकाचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर अमनशी तिचं अफेअर सुरू झालं होतं. अमनपासून ती गरोदर राहिल्याचं कळताच त्याने तिला गर्भपाताचा सल्ला दिला होता. मात्र चंद्रिकाने गर्भपात केला नाही. अखेर जेव्हा मुलगा 14 महिन्यांचा झाला तेव्हा गेल्या महिन्यात चंद्रिका आणि अमनने लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारी चंद्रिका किचनमध्ये होती आणि तिचं बाळ रडत होतं. तेव्हा तिने पतीला बाळाला सांभाळण्यास सांगितलं होतं. अमन मुलाला घेऊन बेडरुममध्ये गेला आणि थोड्या वेळानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अनेकदा जमिनीवर काहीतरी आदळल्याचाही आवाज झाल्याने घाबरलेली चंद्रिका बेडरुमकडे धावत गेली. तेव्हा तिचं बाळ जमिनीवर जखमी अवस्थेत होतं. चंद्रिका तिच्या बाळाला घेऊन तातडीने रुग्णालयात गेली.