Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप
Video : 'कॉकरोच जनता पार्टी'ने (Cockroach Janta Party) ने 20 जुलै रोजी जंतरमंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला. स्वतःच्या हक्कांसाठी पुढे आलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाने संताप व्यक्त केला. 'देशाचं मीठ खाल्ल आहे, त्यामुळे थोडं तरी निभवा...', असं गायक म्हणाला आहे.

दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (Cockroach Janta Party) संसदेकडे मोर्चा काढत प्रमुख मागण्या केल्या आहे. त्यामधील सर्वात पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.. नीट पेपरफुटीनंतर सीजेपीने आपला आवज बुलंद केला असून त्यांनी देशातील सर्वच स्तरातून पाठिंब मिळत आहे… सेलिब्रिटी देखील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला खंबीर साथ देताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनीजंतरमंतर येथे पोहोचून कॉकरोच जनता पार्टी आणि उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांचं समर्थन केलं. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक विशाल ददलानी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
संताप व्यक्त करत विशाल म्हणाला, ‘मुलांवर हात उचलला आहे त्यांनी… मुलं जी फक्त त्यांच्या हक्कासाठी उभी होती… आपल्या भविष्यासाठी, देशाच्या भविष्यासाठी, सर्वांच्या भविष्यासाठी उभी होती… त्यांना मारण्यात आलं, कुत्र्यांसारखं मारलं… काठ्यांनी मारलं, टिएर गॅसने… काय बोलायचं? जे लोकं आता शांत आहेत, तुम्ही जगत कसे आहात? किती सलाम ठोकणार, किड्यांसारखं जगताय, थोडीतरी लाज बाळगा.. या देशाचं मीठ खाल्लं आहे. थोडं तर निभवा… थोडं तरी…’. असं देखील विशाल ददलानी म्हणाला आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला झगमगत्या विश्वातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. अनुराग कश्यप, हृतिक रोशन, स्वरा भास्कर, कुनिका सदानंद, राखी सावंत, अभय देओस, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, प्रकाश राज… यांनी आंदोलकांचं समर्थन केलं आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलकांच्या मागण्या…
‘कॉकरोच जनता पार्टी’ कडून करण्यात आलेली सर्वांत पहिली आणि महत्त्वाची मागणी म्हणजे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा… त्यानंतर NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तिसरी मागणी म्हणजे, परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा कराव्यात… एवढंच नाही तर, असं देखील समोर येत आहे की, आंदोलनात सोनम वांगचुक यांच्या सुटकेची देखील मागणी केली आहे. त्यांच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरु आहे.