AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपल्या नेत्यांनाही प्रश्न विचारा, फक्त मान खाली ठेवून…’, CJP च्या आंदोलनावर प्रसिद्ध गायिकेचं रोखठोक मत

'आपल्या नेत्यांनाही प्रश्न विचारा, फक्त मान खाली ठेवून...', कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पुढे येत स्वतःचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केलेली असताना. प्रसिद्ध गायिकेने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट करत रोख मत व्यक्त करण्यास सांगितलं आहे.

'आपल्या नेत्यांनाही प्रश्न विचारा, फक्त मान खाली ठेवून...', CJP च्या आंदोलनावर प्रसिद्ध गायिकेचं रोखठोक मत
| Updated on: Jul 21, 2026 | 8:15 AM
Share

भारताची राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. NEET पेपरफुटी प्रकरणावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमानाम्याच्या मागणीसाठी CJP आंदोलकांनी जंतर-मंतरवरून संसदेकडे धडक मोर्चा काढला. या आंदोलनाचे पडसाद फक्त दिल्लीत नाही तर, अन्य ठिकाणी देखील दिसून आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले, पण दिल्लीला जाण्याची तयारी केल्यानंतर देखील जाता न आल्याची खंत गायिका शाल्मली खोलगडे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. शिवाय आपल्या नेत्यांनाही प्रश्न करा. बस मान खाली ठेवून सगळं सहन करु नका…. असं देखील गायिका म्हणाली आहे.

शाल्मली खोलगडे हिची सोशल मीडिया पोस्ट

फेसबूकवर पोस्ट करत शाल्मली म्हणतेय, परवाच्या रात्री खूप रडले, पण पंकज बरोबर पळायला गेले सकाळी तेव्हा थोडी शांती मिळाली मनाला. मी काही मोठी सेलिब्रिटी नाही. पण काहीच करता येऊ नये ह्याची घुसमट खरी आहे. मी आज सकाळची तिकीट काढलेली दिल्लीला जायला, पूर्ण तयारी होती माझी प्रोटेस्टचा भाग व्हायची… पण माझ्या कुटुंबाला जपण्यासाठी म्हणून गेले नाही. आवाज असूनही एक मंच असूनही बोलता येऊ नये ही कसली लोकशाही? कोणाचीच बाजू घेत नाही. नुसती एक विनंती करते तुम्हाला, प्रश्न विचारा, खंत व्यक्त करा… डोळे बंद कोणावरही विश्वास ठेवू नका.. करा… माझ्या या विचारांना देखील प्रश्न करा. पण तसेच आपल्या नेत्यांनाही प्रश्न करा. बस मान खाली ठेवून सगळं सहन करु नका…, असं रोखठोक मत शाल्मली हिने व्यक्त केलं आहे.

सांगायचं झालं तर, दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP नं शांततापूर्ण आंदोलन सुरू केलं. नारे देत आंदोलकांनी स्वतःच्या मागण्या मांडल्या. पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला…  याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सेलिब्रिटींनी देखील मोठा पाठिंबा दर्शविला आहे. अनेकांनी उपोषण स्थळी जाऊन विद्यार्थ्यांचं समर्थन केलं,  अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. “मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. काही उत्तर आले नाही, त्यामुळे मी आंदोलनात सामील झाले.” असं जंतरमंतरवर दाखल झालेल्या अभिनेत्री शबाना आझमी म्हणाल्या. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांचं देखील समर्थन केलं…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...