डिलिव्हरीनंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये भारती सेटवर दाखल, मुलगी न होण्यावर केलं मोठं वक्तव्य, म्हणाली ‘आता…’

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. अशातच आता तिने आई झाल्यानंतर 20 दिवसांनंतर 'लाफ्टर शेफ्स 3' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

डिलिव्हरीनंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये भारती सेटवर दाखल, मुलगी न होण्यावर केलं मोठं वक्तव्य, म्हणाली आता...
| Updated on: Jan 07, 2026 | 7:05 PM

Bharti Singh : लोकप्रिय कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट भारती सिंग पुन्हा एकदा आई झाली असून तिने 19 डिसेंबर रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे डिलिव्हरीनंतर अवघ्या 20 दिवसांतच भारती कामावर परतली असून ती ‘लाफ्टर शेफ्स सीझन 3’ होस्ट करण्यासाठी पुन्हा एकदा सेटवर दाखल झाली आहे. तिच्या या कमबॅकचे पापाराझींनी आनंदात स्वागत केले.

भारती सिंगने अद्याप आपल्या दुसऱ्या मुलाचे अधिकृत नाव जाहीर केलेले नाही. मात्र, घरात सगळे जण त्याला प्रेमाने ‘काजू’ म्हणत असल्याचे तिने सांगितले.
‘लाफ्टर शेफ्स 3’च्या सेटबाहेर पापाराझींशी संवाद साधताना भारतीने आपल्या खास विनोदी अंदाजात अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या.

पापाराझींनी तिला शुभेच्छा दिल्यानंतर भारती म्हणाली, ‘परत काजू आला… वाटलं होतं किशमिश येईल, पण काजूच आला.’ यावर एका पापाराझीने गंमतीने विचारले, किशमिश नंतर येईल? हे ऐकताच भारती थोडी चकित झाली आणि हसत म्हणाली, हेच करत बसू का? शूटिंगही असते ना.

मुलगा झाला म्हणून काय करणार? भारतीचा सवाल

यानंतर भारती सिंगने पापाराझींना मिठाई वाटली. यावेळी ती म्हणाली, ‘मुलगी नाही झाली तर मी काय करू? ही सगळी हर्षची चूक आहे.’ यावर पापाराझींनी विचारले, हर्षची चूक कशी? त्यावर भारतीने अगदी निरागसपणे उत्तर दिले, म्हणतात ना, मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषावर अवलंबून असतं. पुढे ती हसत म्हणाली, मुलगी पुढच्या वेळेस. त्यानंतर ती म्हणाली, मी तुम्हाला निराश केलं, मुलगी नाही झाली. यावर भारतीचा पती हर्ष लिम्बाचियानेही गंमतीत प्रतिक्रिया देत म्हटले, पुढेही सावन येणारच आहे.

काजूची झलक कधी बघायला मिळणार?

भारती सिंगने अद्याप आपल्या दुसऱ्या मुलाची कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. चाहत्यांना ‘काजू’चे फोटो पाहण्याची उत्सुकता असून, लवकरच ती चाहत्यांसोबत ही आनंदाची झलक शेअर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डिलिव्हरीनंतर इतक्या लवकर कामावर परतणे हे भारतीच्या व्यावसायिकतेचे आणि मेहनतीचे उदाहरण मानले जात आहे. आईसोबतच करिअरचा समतोल साधण्यासाठी भारती सिंग पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.