त्या ऑडिओ क्लीपने तापवलं ठाण्यातील राजकारण; माजी महापौर थेट म्हणाल्या…
वैचारिक लढाई विरोधकांना माझ्या बरोबर करता येणार नाही म्हणून एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून जातीय राजकारण करत आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, कुठेतरी पराभव दिसतोय म्हणून अशी खेळी खेळली जात आहे, अशा शब्दात मिनाक्षी शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. यावर माजी महापौर मीनाक्षी शिंदे स्पष्टच बोलल्या, वैचारिक लढाई विरोधकांना माझ्या बरोबर करता येणार नाही म्हणून एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून जातीय राजकारण करत आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, कुठेतरी पराभव दिसतोय म्हणून अशी खेळी खेळली जात आहे, अशा शब्दात मीनाक्षी शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
मीनाक्षी शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार AI च्या मार्फत त्यांच्या आवाजातील अजून दोन ऑडिओ बनवल्या आहेत आणि त्या 12 तारखेला व्हायरल करण्याचा प्रयत्न आहे. राजकारण किती खालच्या पातळीला गेलेलं आहे हे या कृतीतून दिसून येतं, असं देखील शिंदे म्हणाल्या. गेली 15 वर्ष प्रभागात मी काम करते, पण कधी जातीचं राजकारण केलं नाही, अशी कबुलीच त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. विरोधक आपल्या जातीला एकत्र करण्यासाठी अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप व्हायरल करत आहेत. त्यात जातीचा उल्लेख करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. राज्यभरात निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे समाजात कलह पसरवून तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. माझा प्रचार बघून आपण निवडून येऊ शकत नाही हे विरोधकांना समजलं आहे. त्यामुळेच ते असं घाणेरडं कृत्य करत आहेत. विचारांची लढाई असावी पण वैयक्तिक टीका करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल

