AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आधी स्टेजवर बोलावलं, बुके दिला नंतर थेट… आयोजकांनी सुनील पालला दिली नको ती वागणूक

Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील पालला एका कार्यक्रमामध्ये आयोजकांनी दिलेली वागणूक ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Video: आधी स्टेजवर बोलावलं, बुके दिला नंतर थेट... आयोजकांनी सुनील पालला दिली नको ती वागणूक
सुनील पालImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 31, 2026 | 6:26 PM
Share

कलाकारांना जितका मानसन्मान मिळतो तितकाच कधी कधी अपमानही सहन करावा लागतो. असाच एक प्रकार नुकताच कॉमेडियन सुनील पाल यांच्यासोबत घडला. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर कार्यक्रमात त्यांचा अपमान करण्यात आल्याचे दिसत आहे. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, मुंबईतील एका काव्य संमेलनात सुनील पाल यांना स्टेजवर बोलावण्यात आले. त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. आभार मानत सुनील पाल माईकजवळ जातात, पण त्यांच्या बाजूला उभा असलेला आयोजक वारंवार त्यांना थांबवतो आणि स्टेजवरून खाली उतरण्यास सांगतो. सुनील पाल यांनी यावेळी कमालीचा संयम दाखवला. ते प्रेक्षकांसमोर आदराने झुकले आणि काहीही न बोलता आपल्या बॉडी लँग्वेजद्वारे सर्वांचे आभार मानले. मात्र, आयोजकाने माईकवरून त्यांचा हात झटकून लावला आणि स्पष्ट शब्दांत सांगितले, “एक सेकंद, आप स्टेज से उतरिए. इसके आगे कुछ नहीं. जितना किया है उतना है. आप बैठ जाइए.” सुनील पाल यांनी शांतपणे “मला धन्यवाद तरी करू द्या,” असे म्हटले, तरीही आयोजकाने त्यांची एकही गोष्ट ऐकली नाही आणि वारंवार स्टेज सोडण्यास सांगितले.

घटना कधी आणि कुठे घडली?

हा व्हिडीओ १७ जानेवारी २०२६ रोजी जुहू येथील इस्कॉन मंदिरात आयोजित काव्य संमेलनातील आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांना देण्यात आलेली वागणूक पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

सुनील पाल यांच्याविषयी

सुनील पाल हे पूर्वी कपिल शर्मा शोमध्ये काम करणारे कलाकार होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी हा शो सोडला होता. त्यावेळी कपिल शर्मा आणि सुनील पाल यांच्यात भांडण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नंतर कपिलने त्यांना शोमध्ये परत बोलावले होते, पण सुनील पाल यांनी नकार दिला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कलाकारांसोबत होणाऱ्या अपमानाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...