अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीने बाप्पाची आरती केल्याने वाद, अभिनेत्रीचा मोठा निर्णय, थेट..
सांगलीच्या पंचायत संस्थानच्या गणपती पूजेवरुन वाद रंगताना दिसला. वारसदाराचा वाद उद्भवल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री भाग्यश्री गैरहजर राहिली. संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन, राणी राजलक्ष्मी विसर्जनावेळी उपस्थित होते.

शंकर देवकुळे, टीव्ही9 मराठी, सांगली : सांगलीच्या पंचायत संस्थानच्या गणपती पूजेवरुन वारसदाराचा वाद उद्भवल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री भाग्यश्री गैरहजर राहिली. संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन, राणी राजलक्ष्मी विसर्जनावेळी उपस्थित होते. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या उपस्थितीत गणपतीची आरती पार पडली..पूजावादानंतर अभिनेत्री भाग्यश्री विसर्जन मिरवणुकीलाही हजर असेल., अशा चर्चा होत्या. मात्र ,वादानंतर बहुदा भाग्यश्रीनं अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतली. या वादाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. स्वत: चे वडीलच विरोध करताना दिसले. मैने प्यार किया चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री भाग्यश्री ह्याच पटवर्धन संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन यांची लेक आहे. त्यांना एकूण 3 कन्या असून मुलगा नाहीय.
2024 साली राजे विजयसिंह पटवर्धन यांनी आदित्यराजे पटवर्धन यांना दत्तक घेवून संस्थानचा पुढचा वारसदार घोषित केलं. दुसरीकडे यंदा 4 वर्षानंतर अभिनेत्री भाग्यश्री सांगलीच्या संस्थानातील गणेशोत्सवाला आल्या…. त्यांनी संस्थानच्या मालकीच्या गणपतीची पूजाही केली., त्यावरुनच खुद्द त्यांच्याच आई-वडिलांनी पूजेला विरोध केला. ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.
केवळ पटवर्धन घरातीलच किंवा चित्पावन ब्राह्मण कोकणस्थच मंदिराच्या गाभाऱ्यात जावू शकतो., अशी भूमिका राजे विजयसिंह पटवर्धन यांनी घेतली. त्यामुळे यंदा पूजेचा मान दत्तकपुत्र आदित्यराजे पटवर्धन यांना होता., असं ते म्हणाले…खुद्द घरातली मुलगी जी केवळ लग्न होवून दुसऱ्या घरी गेली म्हणून तिचा अधिकार संपला का., यावरुन असे अनेक प्रश्न विचारले गेले…
भाग्यश्री पटवर्धन यांनी गणपती मंदिरात केलेली कृती चुकीची असल्याचंही ते यावेळी म्हणाले. भाग्यश्री यांच्यासह अन्य दोन मुलींनाही कुटुंबात समान मानसन्मान दिला जातो. एकदा प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन पूजा अथवा आरती करणे योग्य नसल्याचे विजयसिंहराजे यांनी म्हटले. आपल्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही विजयसिंहराजे यांनी उत्तर दिले. आजारी असल्याच्या चर्चा होत असल्यातरीही आपण तंदुरुस्त असून आपल्यात पुरेशी ताकद असल्याचे त्यांनी म्हटले. आजारी असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.