AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगामी निवडणुकीआधी भाजपने डाव टाकला; काय आहे सेवा संकल्प अभियान? रविंद्र चव्हाणही मैदानात

आगामी निवडणुकीआधी भाजपने डाव टाकला आहे. पोटनिवडणूक आणि आगामी निवडणुकीसाठी मास्टर प्लान आखला आहे. आता भाजपने सेवा संकल्प अभियान सुरू केलं आहे.

आगामी निवडणुकीआधी भाजपने डाव टाकला; काय आहे सेवा संकल्प अभियान? रविंद्र चव्हाणही मैदानात
bjp news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 9:47 PM
Share

देशात उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या दोन्ही राज्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपसहित विरोधकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप आणि विरोधकांनी आतापासून मतदारांना जोडण्यासाठी प्लान आखण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे काही महिन्यांपासून काँग्रेसने ‘छात्र की गूंज’ हा कार्यक्रम हाती घेतलाय. या माध्यमातून सर्वसामान्य आणि जेन-झी मतदारांशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला. दुसरीकडे भाजपने सेवा संकल्प अभियान हाती घेतलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने सेवा संकल्प अभियान हाती घेतलं आहे. पंतप्रधान मोदींची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि 2047 पर्यंत विकसित भारत या संकल्पाशी जोडण्यासाठी सेवा संकल्प अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. या अभियानांतर्गत विविध शैक्षणिक आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबत सरकारी आणि खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी महाविद्यालय , उच्च शिक्षण संस्थांमध्येही चित्रकला, भाषण आणि सामान्य ज्ञान स्पर्धा देखील आयोजित केल्या जाणार आहेत. हे अभियान महिनाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भाजपचा 12 कलमी कार्यक्रम काय?

सेवा संकल्प अभियानाअंतर्गत रक्तदान शिबीर, सेवा ज्योती कलस यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसी ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, आभार प्रदर्शन, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी कामे पोहोचवण्यात येणार आहेत. या अभिायानांतर्गत एकूण बारा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

वसईतही अभियानाचे उद्घाटन

वसई-विरार शहर महानगरपालिकेत ‘सेवा संकल्प अभियान’ महापौर आजीव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदाला वाढदिवसाच्या दिवशी २५ वर्षे झालेत. त्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच त्यांना या सेवांचा लाभ मिळवून देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानामार्फत नागरिकांपर्यंत महापालिकेच्या सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

डोंबिवलीत ‘सेवा संकल्प अभियाना’चा धमाका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत डोंबिवलीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने आगामी राजकीय घडामोडींसाठी एक मोठा प्लान आखल्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मंदिरात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा आणि भाजपच्या विकसित भारत संकल्पाची घरोघरी चर्चा घडवून आणण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे. यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले, आशीर्वादाचा दिवा पंतप्रधान मोदी यांच्या सेवाव्रताचे आणि विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. तुम्ही घरी किंवा परिसरात असाच दिवा प्रज्वलित करावा. तसेच लाडक्या पंतप्रधान मोदी यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन चव्हाणांनी केलं.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं