
अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरले आहेत.

माजी मिस वर्ल्ड असलेल्या प्रियांकाने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर केले आहे. प्रियांकानेही तिच्या कारकीर्दीत बर्याच वेळा आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या आहेत आणि त्या लीलया पार पडून आपल्या चाहत्यांना वेड लावलं आहे.

आता प्रियंका तिच्या चाहत्यांना तिच्या बोल्ड स्टाईलने वेड लावते. नुकतीच पुन्हा एकदा देसी गर्लची एक नवी स्टाईल पाहायला मिळत आहे.

प्रियंकाने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. वास्तविक, प्रियंकाने केलेलं हे फोटो बिलबोर्ड संगीत पुरस्कारांमध्ये काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. हा सोहळा आज प्रदर्शित होणार आहे, जो निक जोनस होस्ट करणार आहे.

प्रियांकाने तिच्या बोल्ड स्टाईलमधले अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जिथे ती दोन फोटोंमध्ये एकटीच दिसली आहे, तर एका फोटोमध्ये ती पती निक बरोबर दिसली आहे.

फोटोंमध्ये प्रियंका चोप्राने स्किन कलरच्या ड्रेस परिधान करून बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने आपले केस मोकळे सोडले आहेत. यावेळी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक आत्मविश्वास दिसून येत आहे.