AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसलेंची नात नव्हे, मोहम्मद सिराज Bigg Boss फेम या अभिनेत्रीला करतोय डेट ? वर्षभरापासून…

क्रिकेटर मोहम्मद सिराज हा गेल्या बऱ्याच काळापासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचं नाव ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांची नात जनाईशी जोडलं गेलं होतं. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये त्या दोघांचे हसतानाचे काही फोटो व्हायरल झाले आणि ही वहिनी आहे का असा सवाल विचारत अनेक लोकांनी मोहम्मद सिराज- जनाईच्या रिलेशनबद्दल चर्चा सुरू केली.

आशा भोसलेंची नात नव्हे, मोहम्मद सिराज Bigg Boss फेम या अभिनेत्रीला करतोय डेट ? वर्षभरापासून...
मोहम्मद सिराज
| Updated on: Jan 30, 2025 | 11:08 AM
Share

भारताचा आघाडीचा क्रिकेटर मोहम्मद सिराज हा गेल्या बऱ्याच काळापासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचं नाव ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांची नात जनाईशी जोडलं गेलं होतं. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये त्या दोघांचे हसतानाचे काही फोटो व्हायरल झाले आणि ही वहिनी आहे का असा सवाल विचारत अनेक लोकांनी मोहम्मद सिराज- जनाईच्या रिलेशनबद्दल चर्चा सुरू केली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच आधई जनाईने आणि नंतर सिराजनेही एकमेकांसोबत फोटो तर शेअर केला पण तिला बहीण म्हणत सिराजने डेटिंगच्या अफवांवर पूर्णविराम लावला. मात्र आता सिराज पुन्हा चर्चेत आला असून त्याचं नाव बिग बॉस या रिॲलिटी शो फेम अभिनेत्रीशी जोडलं जात आहे.

लेटेस्ट रिपोर्टनुसार, भारताचा हा स्टार गोलंदाज बिग बॉस फेम माहिरा शर्मा हिला डेट करत आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सिराज आणि माहिरा शर्मा एकमेकांना डेट करत आहेत. सध्या त्यांचं नातं सुरूवातीच्या फेजमध्ये आहे, एकमेकांना जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र मोहम्मद सिराज किंवा माहिरा शर्मा, यांच्यापैकी कोणीच या नात्यावर किंवा चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी रिलेशनची बातमी स्वीकारलेली तर नाही पण त्या वृत्तांना नकारही दिला नाहीये.

वर्षभरपासून करत आहेत डेट ?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोघांच्या डेटिंगच्या अफवांनी जोर पकडला होता. सिराजने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्रीचा फोटो लाइक केला होता, त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे अशी अटकळ सोशल मीडियावर बांधली जात होती. मात्र आता एका वृत्तपत्रात्या ताज्या वृत्तामुळे या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

2023 मध्ये पारस छाब्राशी झालं ब्रेकअप

याआधी माहिरा शर्मा ही बिग बॉस फेम पारस छाब्राला डेट करत होती. पारस छाबरा आणि माहिरा शर्मा बिग बॉसच्या घरात भेटले आणि त्यांची जवळीक वाढू लागली. या जोडप्याचं हे नातं बिग बॉसच्या बाहेरही कायम राहिलं. मात्र, 2023 मध्ये त्यांचे रिलेशन संपुष्टात आलं. माहिरा शर्माने या ब्रेकअपनंतर अभिनेत्याला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आणि त्यांचे सर्व जुने फोटोही हटवले.

अभिनेत्यानेही कन्फर्म केलं ब्रेकअप

पारस छाब्रानेही एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांच्या ब्रेकअपची बातमी कन्फर्म केली. आम्ही आठवड्याभरापासून बोलत नाहीयोत. छोट्या-छोट्या गोष्टींवरून आमचा सतत वाद व्हायता, बिग बॉसच्या घरातही आमची भांडण व्हायची, पण आमचं ब्रेकअप होईल असा मी कधीच विचार केला नव्हता, असं पारस म्हणाला होता.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.