धर्मेंद्र यांच्या निधनानंतर निराश दिसली लेक ईशा… बाय म्हणाली अन्…

Dharmendra Daughter Esha deol : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यानंतर पहिल्यांदा अभिनेत्री ईशा देओल हिला स्पॉट करण्यात आलं. वडिलांच्या निधनाच्या एक महिन्यानंतर ईशा कॅमेऱ्यासमोर आली. सध्या ईशा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर निराश दिसली लेक ईशा... बाय म्हणाली अन्...
अभिनेत्री ईशा देओल
| Updated on: Dec 24, 2025 | 1:41 PM

Dharmendra Daughter Esha deol : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. आज म्हणजे बुधवारी धर्मेंद्र यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. वडिलांच्या निधनाच्या एक महिन्यानंतर ईशा कॅमेऱ्यासमोर आली. सध्या ईशा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई विमानतळावर ईशा हिला स्पॉट करण्यात आलं. जेथे ईशा हिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. ईशा हिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ईशा देओल आणि धर्मेंद्र दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं… दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आजही व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, ईशा कायम धर्मेंद्र यांच्यासोबत सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट करायची… त्यांच्या निधनानंतर, ईशा हिने वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या, ज्यातून तिच्या भावना स्पष्टपणे दिसून आल्या. आता मुंबई विमानतळावर ईशा हिला स्पॉट करण्यात आलं.

 

 

विमानतळावर ईशा देओल दिसल्यानंतर पापाराझींनी तिला स्पॉट देखील केलं आणि तिच्या कशी आहेस असं विचारलं… पण ईशा हिने पापाराझींसोबत संवाद साधला नाही. नमस्कार केला आणि ती पुढे निघून गेली.. त्यानंतर एका व्यक्तीने अभिनेत्रीला बाय केलं… त्यावर ईशा हिने देखील मागे वळून पापाराझींना बाय केलं…. सध्या ईशा हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर,  24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबियांनी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं. शोक सभेत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली… पण देओल कुटुंबियांनी आयोजित केलेल्या शोकसभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना देओल नव्हत्या.  अशात हेमा मालिनी यांनी 11 डिसेंबर रोजी दिल्ली याठिकाणी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन केलं होतं.

धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा….

धर्मेंद्र यांने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता धर्मेंद्र त्यांच्या शेवटच्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. ‘इक्किस’ सिनेमातून धर्मेंद्र चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्यांच्या सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला असून, सिनेमा 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.