AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाय हिल्स, बिकिनीमध्ये डेबिनाचं मॅटर्निटी फोटोशूट; नेटकऱ्यांकडून टीकांचा भडीमार

'लाज वाटली पाहिजे तुला'; मॅटर्निटी फोटोशूट पाहून डेबिनावर भडकले नेटकरी

हाय हिल्स, बिकिनीमध्ये डेबिनाचं मॅटर्निटी फोटोशूट; नेटकऱ्यांकडून टीकांचा भडीमार
डेबिना बॅनर्जीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 04, 2022 | 8:25 PM
Share

मुंबई- प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री डेबिना बॅनर्जी लवकरच आई होणार आहे. डेबिना आणि गुरमीत चौधरी यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच डेबिनाने मुलगी लिएनाला जन्म दिला होता. नुकतेच तिने सोशल मीडियावर मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. मात्र या व्हिडीओमुळे डेबिना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

डेबिनाने काळ्या रंगाचा बिकिनी आणि त्यावर ओव्हरसाइज्ड शर्ट परिधान करत फोटोशूट केला आहे. त्यावर त्याच रंगसंगतीचे हाय हिल्स तिने घातले आहेत. मात्र तिचा हा लूक चाहत्यांना पसंत पडला नाही. अनेकांनी कमेंट करत डेबिनावर टीका केली आहे.

मॅटर्निटी फोटोशूटच्या नावाखाली डेबिनाने अंगप्रदर्शन केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘भारतीय कपड्यांमध्येही चांगलं फोटोशूट करता आलं असतं’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘पाश्चिमात्य कपड्यांनाच फॉलो केलं पाहिजे असा काही नियम नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तुला लाज वाटली पाहिजे, ही भारतीय संस्कृती नाही’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी डेबिनाला ट्रोल केलंय.

डेबिनाने जेव्हा दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं, तेव्हासुद्धा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. पहिल्या मुलीच्या प्रसूतीनंतर चार महिन्यांनी तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. एका युजरने डेबिनाला विचारलं होतं की, दुसऱ्यांदा गर्भधारणेपूर्वी तुम्ही लियानाला थोडा वेळ दिला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? यावर डेबिना म्हणाली होती, “मी पण तुम्हाला एक प्रश्न विचारते. जेव्हा काहींना जुळी मुलं होतात, तेव्हा ते काय करतात?”

डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गुरमीत आणि डेबिनाने ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा