Video : दीपिका पडूकोण का चिडली ? कॅमेऱ्यावरच काढला राग, बेबी बंपही…

Deepika Padukone News : अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो हटवल्यानंतर त्याचं आणि दीपिका पडूकोणचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. यानंतर दीपिका पहिल्यांदाच पापाराझींसमोर आली मात्र तेव्हा ती नाराज दिसली. समोरच्या व्यक्तीच्या हातातील कॅमेऱ्यावरच तिने जोरदार फटका मारला. एरवी अतिशय खेळीमेळीने, नम्रपणे वागणाऱ्या दीपिकाचा हा अवतार पाहून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Video : दीपिका पडूकोण का चिडली ? कॅमेऱ्यावरच काढला राग, बेबी बंपही...
दीपिका पडूकोण
Image Credit source: social media
| Updated on: May 09, 2024 | 9:22 AM

अभिनेत्री दीपिका पडूकोण लवकरच आई होणार आहे. याचा तिच्या चाहत्यांना खूपच आनंद आहे. मात्र त्याच दरम्यान दीपिकाच्या एका कृतीने सर्वांनाच धक्का बसला. खरंतर दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचे आणि दीपिकाच्या लग्नाचे फोटो हटवले. त्यानंतर दीपिका रणवीर पहिल्यांदाच स्पॉट झाले. तो दोघेही त्यांच्या बेबीमूनवरून परत आले. मात्र त्या दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये दीपिका चिडलेली दिसली. कारमधून उतरून दीपिका- रणवीर चालत पुढे जात होते. तेव्हा जीपिकाने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रय्तन केला. एवढंच नव्हे तर समोरच्या व्यक्तीच्या कॅमेऱ्यावरही तिने जोरात फटका मारला. एरवी अतिशय खेळीमेळीने, नम्रपणे वागणाऱ्या दीपिकाचा हा अवतार पाहून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

चालताना दीपिकाला समोरचा कॅमेरा दिसला, पण तिने सुरूवातील त्याकडे लक्ष दलं नाही. पण कॅमेरामनच्या जवळ आल्यावर मात्र दीपिकाने कॅमेरा पकडण्याचा प्रयत्न करत एक फटका मारला आणि ती तिथून निघून गेली. ती नक्की मजा करत होती की कॅमेरा पाहून नाराज होती, यावर आता विविध चर्चा सुरू आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांचं म्हणणं होत की ती फक्त मजा करत आहे, तर काहींच्या मते तिला तिथे पापाराझींना पाहून आनंद झाला नाही, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर व्हायचं नव्हतं. त्यामुळे तिच्या प्रायव्हसीचा आदर राखला पाहिजे.

रणवीरने लग्नाचे फोटो हटवले

दरम्यान रणवीर सिंगने त्याच्या लग्नाचे फोटो हटवल्यानंतर किंवा आर्काईव्ह (संग्रहित) केल्यानंतर दीपिका-रणवीर दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसले. इन्स्टारामवरील रणवीरच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांमध्ये काही आलबेल नाही का अशी चर्चा सुरू झाली. पण रिपोर्ट्सनुसार, रणवीर-दीपिकामध्ये कोणतेही मतभेद झालेले नाहीत, त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या देखील नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने केवळ लग्नाचे फोटोच नाही तर 2023 पूर्वीच्या सर्व पोस्ट संग्रहित केल्या आहेत.

दीपिका-रणवीर एकत्र घालवतायत वेळ

रिपोर्ट्सनुसार ‘त्याने 2022-2023 पूर्वीचे सर्व फोटो हटवले आहेत. हे फक्त लग्नाच्या फोटोंबद्दल नाही. मात्र दीपिकासोबतचे त्याचे लेटेस्ट फोटो अजूनही इन्स्टाग्रामवर आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्यात काहीतरी गडबड असल्याचा अंदाज लोक लावत आहेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. ते आपल्या पहिल्या बाळाचे जगात स्वागत करण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत आणि जीवनाच्या या टप्प्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत’. दीपिका-रणवीरने भारतातील एका शांत ठिकाणी खूप छान वेळ घालवला आहे. रणवीर-दीपिका दोघांनीही सोशल मीडियावरून फोटो काढून टाकल्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.