
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलीवूड मधील सर्वात आवडते कपल असून ते त्यांच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. चाहतेही या जोडीकडे आयडिअल जोडी म्हणजेच आदर्श कपल म्हणून पाहतात. रणवीर (Ranveer Singh) ज्या पद्धतीने त्याची पत्नी दीपिकावर (Deepika Padukone) प्रेम व्यक्त करतो ते कौतुकास्पद आहे. दीपिकाही अनेकदा रणवीरचा उल्लेख करताना दिसते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. रणवीर-दीपिकाच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं होतं. या पार्श्वभूमीवर दीपिकाने त्या दोघांच्या नात्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, पुन्हा एकदा दीपिका पदुकोणने तिचा पती रणवीर सिंगशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. नुकतेच हे कपल एकत्र व्हेकेशनसाठी भूतानला गेले होते. एका मुलाखतीदरम्यान, दीपिकाने त्यांच्या सुट्टीचा अनुभव सांगितला. लांबवर चालणे, वेगवेगळ्या जागा पाहणे आणि जेवणे अशा गोष्टींमध्ये रणवीर व तिला आनंद मिळतो, म्हणून ते सुट्टीवर असताना या सर्व गोष्टी करत असतात. जेव्हा ती रणवीरसोबत असते तेव्हा तिला खूप सुरक्षित वाटते, असेही दीपिकाने आवर्जून सांगितले.
अभिनेत्रींच्या शेल्फ लाइफबाबतही दीपिकाला प्रश्न विचारण्यात आले होते. दीपिकाच्या म्हणण्यानुसार, तिला असे कधीच वाटले नाही कारण रणवीरने नेहमीच तिला, तिची स्वप्ने आणि तिची महत्त्वाकांक्षा प्रथम ठेवली आहे. तसेच मी सर्व चित्रपटांच्या प्रभावाखाली मोठी झाले आहे. माझ्या आजूबाजूच्या लोकांचे नातेसंबंध आणि विवाह यांचाही आपल्यावर मोठा प्रभाव असल्याचे दीपिकाने नमूद केले.
आजकालच्या जोडप्यांबाबत बोलताना दीपिकाने सांगितले की, आजच्या जोडप्यांमध्ये संयमाचा अभाव आहे. अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की तिच्या आधीही इतर अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्याकडून बरंच काही शिकता येऊ शकतं. संयम राखणे हे सर्वात महत्वाचे असते, असेही ती म्हणाली.
दीपिका आणि रणवीरचे लग्न 2018 मध्ये झाले होते. दोघांच्या लग्नाला आता 5 वर्षे पूर्ण होत आहेत. दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य तसेच त्यांचे प्रोफेशनल लाईफ अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज करतात.