AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेशच्या ‘वेड’लाही टाकणार मागे

'देऊळ बंद 2' हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचलं आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट रितेश देशमुखच्या 'वेड'लाही मागे टाकणार असल्याचं चित्र आहे.

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेशच्या 'वेड'लाही टाकणार मागे
रितेश देशमुख, देऊळ बंद 2Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2026 | 10:35 AM
Share

प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे. स्वामीभक्त थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही ‘देऊळ बंद 2’चे शोज हाऊसफुल होते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘अच्छे दिन’ पहायला मिळत आहेत. आधी रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने जगभरात 130 कोटी रुपयांहून गल्ला जमवत विक्रम रचला. त्यानंतर आता स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचतोय. गेल्या 19 दिवसांत या चित्रपटाने 70.40 कोटी रुपये कमावले आहेत.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 30 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला होता. अवघ्या काही दिवसांतच ‘देऊळ बंद 2’ने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ला मागे टाकलं होतं. तर ‘पावनखिंड’ या चित्रपटाचाही रेकॉर्ड ‘देऊळ बंद 2’ने मोडला होता. आता लवकरच हा चित्रपट रितेशच्या आणखी एका चित्रपटाला मागे टाकणार आहे. हा चित्रपट ‘वेड’ आहे. रितेश आणि जिनिलिया देशमुखच्या या चित्रपटाने जवळपास 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा विक्रम मोडण्यासाठी ‘देऊळ बंद 2’ला अवघे काही कोटी रुपये कमावण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत हा विक्रम मोडला जाईल, अशी शक्यता आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘देऊळ बंद 2’ हा सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमाकांवर पोहोचला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ‘टाइमपास’, ‘ठाकरे’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लय भारी’, ‘पावनखिंड’ आणि ‘नटसम्राट’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे. रितेशच्या ‘वेड’ला मागे टाकल्यास हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. असं झाल्यास ‘राजा शिवाजी’, ‘सैराट’ आणि ‘बाईपण भारी देवा’ हे तीन चित्रपट अजूनही ‘देऊळ बंद 2’च्या पुढे राहतील.

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडेंची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेनं महिला शेतकरीची मुख्य भूमिका साकारली आहे.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा