
नांदेड तालुक्यातील गंगाबेट आणि लोहा तालुक्यातील बेटसांगवी या शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू उपसा केला जातोय. महत्त्वाचं म्हणजे नदीच्या दोन तिरावर रोप वे टाकून हा उपसा करण्यात येतोय.

उपसा करण्यासाठी देसी जुगाड करण्यात आला आहे. जेसीबीला फावडा लावून देसी जुगाड, गोदावरी नदीपात्रात रोप वे टाकून हा वाळू उपसा केला जातोय.

गंगाबेट, बेट सांगवी या दोनच ठिकाणी 40 पेक्षा अधिक वाळू उपसा करणाऱ्या रोप वे आहेत. गोदावरी नदीपात्रा जवळील इतरही गावांमध्ये बिनधास्तपणे हा प्रकार सुरु आहे.

गेले दीड ते दोन महिन्यांपासुन दिवसरात्र वाळू उपसा सुरु असूनही महसूल प्रशासनाला याची खबर नाही का असा सवाल आता विचारण्यात येतोय. तर काही बड्या राजकीय नेत्यांचा थेट वाटा आणि पाठबळ असल्यानं महसूल आणि पोलीस कारवाई करत नाहीत असं म्हटलं जातंय.

रोप वे टाकून अश्या प्रकारे वाळू उपसा करण्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झालाय. या देशी जुगाड रोप वेला वाळू माफ़ियानी गुडगुडी असं नाव दिलं आहे. वाळू माफियांच्या या गुडगुडीनं गोदावरी नदीपात्र पोखरायला सुरुवात केलीये.