‘डोळे उघडून शोधलं असतंस तरी यापेक्षा चांगला..’; पतीसोबतच्या फोटोंमुळे ‘गोपी बहू’ ट्रोल

गोपी बहूचा 'शोनू' आहे तरी कोण? मिस्ट्री मॅनसोबतचे लग्नाचे फोटो पाहून चाहते झाले अवाक्!

डोळे उघडून शोधलं असतंस तरी यापेक्षा चांगला..; पतीसोबतच्या फोटोंमुळे गोपी बहू ट्रोल
Devoleena Bhattacharjee
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 15, 2022 | 10:21 AM

मुंबई: ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी नुकतीच लग्नबंधनात अडकली. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला. देवोलीनाच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले, तेव्हापासून ती कोणासोबत लग्न करतेय, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. तिचा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला होता. मात्र देवोलीनाने पतीसोबतचे फोटो पोस्ट करताच त्यावरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवण्यात सुरुवात केली.

‘मी अभिमानाने सांगू शकते की मी माझं लग्न झालंय आणि होय शोनू.. दिवा घेऊन शोधले असते तरी तुझ्यासारखा भेटला नसता. माझी दु:खं आणि प्रार्थनांचं उत्तर तू आहेस. तुझ्यावर मी खूप प्रेम करते’, असं कॅप्शन देत देवोलीनाने पतीसोबतचे फोटो पोस्ट केले.

तिच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनी देवोलीनाला शुभेच्छा दिल्या. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या निवडीवरून खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ‘दिवा नाही तर एलईडी घेऊन शोधलं पाहिजे होतं’, असं एकाने लिहिलं.

तर ‘दिव्याऐवजी डोळे उघडून शोधलं असतंस तर यापेक्षा चांगला भेटला असता’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. दिसण्यावरून लोकांबद्दल मत बनवणं बंद करा. तो व्यक्ती म्हणून कसा आहे, हे महत्त्वाचं असतं, असंही एका युजरने ट्रोलर्सना फटकारलं.

कोण आहे देवोलीनाचा पती?

देवोलीनाने जिम ट्रेनर शहनवाज शेखशी लग्न केलं. घराजवळच्या जिममध्येच या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. साथ निभाना साथियाच्या सेटवर जेव्हा देवोलीनाचा अपघात झाला होता, तेव्हा शहनवाजने तिची खूप साथ दिली होती.