‘शुगर डॅडी’वरून डिवचणाऱ्या कॉमेडियनला अन् चहलला धनश्रीचं सडेतोड उत्तर

'शुगर डॅडी'वरून कॉमेडियन समय रैनाने डिवचल्यानंतर आता धनश्री वर्माने त्याला आणि पूर्व पती युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर दिलं आहे. घटस्फोटानंतर चहलने 'बी युअर ओन शुगर डॅडी' असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट घातला होता.

शुगर डॅडीवरून डिवचणाऱ्या कॉमेडियनला अन् चहलला धनश्रीचं सडेतोड उत्तर
युजवेंद्र चहल, समय रैना, धनश्री वर्मा
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2025 | 9:26 AM

इन्फ्लुएन्सर, डान्सर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा सध्या ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये झळकतेय. या शोमध्ये येण्यापूर्वी धनश्री क्रिकेटर युजवेंद्र चहलशी झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. या घटस्फोटादरम्यान सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता स्टँड अप कॉमेडियन समय रैनाने त्याच्या सोशल मीडियावर एका व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्याने युजवेंद्र चहलला टॅग करून ‘लव्ह यू, माय शुगर डॅडी’ असं लिहिलंय. समयने अप्रत्यक्षरित्या हा टोमणा धनश्रीला मारला आहे. त्यामुळे आता तिने समय आणि युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर दिलं आहे.

धनश्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या पाळीव श्वानाचा फोटो शेअर केला आहे. ‘काळजी करू नका मित्रांनो, माझ्या आईची वेळ चांगली आहे’, असं तो श्वान म्हणत असल्यासारखं त्यावर लिहिलंय. त्याचसोबत लिंबू-मिरचीचाही एक फोटो आहे. ‘बुरी नजर वाले तेरा मुंह काला’ असं त्यावर लिहिलंय. धनश्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

समय रैनाने त्याच्या एका पॉडकास्टमध्ये तोच टी-शर्ट परिधान केला होता, जो चहलने घटस्फोटानंतर कोर्टाबाहेर घातला होता. त्या टी-शर्टवर लिहिलं होतं, ‘बी युअर ओन शुगर डॅडी’ (तुम्हीच स्वत:चे शुगर डॅडी व्हा). यावरून धनश्रीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. धनश्रीने केवळ पैशांसाठी चहलशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

धनश्रीची पोस्ट-

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच दोघं विभक्त झाले. या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 2025 या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघं एकमेकांपासून विभक्त झाले.

समय रैनाने आधी डिवचलं

समय रैनाने एका व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये युजवेंद्र चहल दिसून येत होता. चहल डोक्यावर हात लावून हसताना दिसतोय. ‘लव्ह यू माय शुगर डॅडी’ असं तिथे लिहिलेलं होतं. हेच रिपोस्ट करत चहलने समय रैनाला थेट इशारा दिला होता. ‘आणखा एका केससाठी तयार राहा..’ असं लिहित त्यासोबत हसण्याचा इमोजी पोस्ट केला होता. समय आणि चहल यांच्यात जरी ही मस्करी सुरू असली तरी धनश्रीने त्यावर प्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. धनश्रीच्या पोस्टमध्ये ‘समय’ असा उल्लेख होता.