धनुष-ऐश्वर्याचा काडीमोड, पण राहतात एकत्रच एका हॉटेलात! रजनीकांतच्या व्याहींनी सांगितलं कारण

धनुषच्या वडिलांनी दोघांचा डिव्होर्स झाल्याची बातमी खोटी असल्याचे म्हणाले आहेत.

धनुष-ऐश्वर्याचा काडीमोड, पण राहतात एकत्रच एका हॉटेलात! रजनीकांतच्या व्याहींनी सांगितलं कारण
धनुष आणि ऐश्वर्या (फाईल फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 3:20 PM

नवी दिल्ली – धनुष-ऐश्वर्या (dhanush aishwarya) हे कपल वेगळे होणार असं सोशल मीडियावर (social media) जाहीर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण अद्याप त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा कधीही झाली नव्हती, त्यामुळं चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी विभक्त (divorce) होत असल्याची माहिती रात्री उशिरा दिली होती. 18 वर्षानंतर विभक्त व्हायचा निर्णय घेतल्याने साऊथ सिनेसृष्टी तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीला देखील धक्का बसला होता. सद्या दोघेही हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजतंय. तसेत ते एकत्र काम करत असल्याची सुध्दा माहिती मिळत आहे.

ETimes च्या बातमीनुसार, धनुष-ऐश्वर्या हे कपल रामोजी राव यांच्या स्टुडिओच्या सितारा हॉटेलमध्ये थांबले आहेत. धनुष आपल्या चित्रपटाच्या शुटिंगमुळे तिथं थांबला आहे. तर ऐश्वर्या तिच्या येणा-या नव्या गाण्यासाठी तिथं थांबली असल्याचं वृत्त आहे. ऐश्वर्याचं गाणं वेलेन्टाईन डे साठी असून ते लवकरात लवकर शुट करण्यासाठी ती रामोजी राव यांच्या स्टुडिओच्या सितारा हॉटेलमध्ये थांबली आहे. ते गाणं येत्या तीन दिवसात शुट केलं जाईल. धनुष-ऐश्वर्या यांची कामादरम्यान भेट झाली की नाही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

17 जानेवारीला झाले विभक्त

धनुष-ऐश्वर्या या दोघांनी 17 जानेवारीला विभक्त होत असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकली. 18 वर्षे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र, शुभचिंतक राहिलो आहे. आजपासून आम्ही आमच्या दोघांचा रस्ता वेगळा करत आहोत. आम्ही दोघांनी आमचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयाला समजून घ्या असं दोघांनी म्हणटलं होतं.

धनुषचे वडिल म्हणतात ते वेगळे झालेचं नाहीत ?

धनुषच्या वडिलांनी दोघांचा डिव्होर्स झाल्याची बातमी खोटी असल्याचे म्हणाले आहेत. “धनुष-ऐश्वर्या यांच्यात एक भांडण झालं आहे, दोघांच्या मतभिन्नतेमुळे ही फक्त भांडणे झाली आहेत. हे आमचं रोजचं कौटुंबिक भांडण आहे. सद्या दोघेही शहराबाहेर असून हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये राहत आहेत. मी त्या दोघांशी बोललो असून दोघांनाही सल्ला दिल्ला” असल्याचे धनुषच्या वडिलांनी सांगितले.

photos : साडीतही मोनालिसाचा धुमाकूळ, फोटो झाले व्हायरल; तुम्ही फोटो पाहिले का ?

Suicide : ऑस्कर विजेत्या डायरेक्टरच्या मुलाची आत्महत्या, बुधवारी झाला वाढदिवस; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा