Dharmaveer Movie : ‘धर्मवीर’ धूमधडाक्यात रिलीज! शिवसेनेकडून ठिकठिकाणी स्पेशल स्क्रिनिंग, कुठे पाहायचा स्पेशल शो? वाचा

हा चित्रपट पाहायला शिवसैनिकांची (Shivsena) आणि सर्वसामान्यांची गर्दी जमणार हे निश्चित. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानपर्यंत अनेक दिग्गज राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून उपस्थितीत होते.

Dharmaveer Movie : 'धर्मवीर' धूमधडाक्यात रिलीज! शिवसेनेकडून ठिकठिकाणी स्पेशल स्क्रिनिंग, कुठे पाहायचा स्पेशल शो? वाचा
DharmaveerImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 7:52 AM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात आणि मनोरंजन क्षेत्रात एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मवीर(Dharmaveer) , स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावरील हा चित्रपट आहे. हा चित्रपट अखेर आज धुमधडाक्यात रिलीज झाला. हा चित्रपट पाहायला शिवसैनिकांची (Shivsena) आणि सर्वसामान्यांची गर्दी जमणार हे निश्चित. त्यामुळेच या चित्रपटाचे धडाक्यात ओपनिंग करण्याची सर्व तयारीही करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलंय. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानपर्यंत अनेक दिग्गज राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून उपस्थितीत होते. स्वर्गीय आनंद दिघेंची कारकीर्द या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना नेत्यांकडून या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले असून त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ : विवियानामध्ये शो आधी जंगी कार्यक्रम

शिवसैनिकांकडून कुठे शोचे आयोजन?

  1. नवी मुंबईत आहे सकाळी 9.30चा शो आहे. शिवसेना नेते हा सिनेमा दाखवणर आहेत.
  2. पुण्यातही या चित्रपटाची तेव्हढीच क्रेझ आहे त्यामुळे पुण्यातही काही शोचे आयोजन करण्यात आले आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. अहमदनगरलाही काही ठिकाणी हे शो दाखवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  5. भिवंडी- हसीन PVR या चित्रपटगृहात सकाळी 09.30 वाजता धर्मवीर चित्रपटाच्या विशेष शोचे शिवसेना शहराध्यक्ष सुभाष माने यांनी आयोजन केला आहे . या वेळी शिवसेना पदाधिकारी ,जुने शिवसैनिक यांना आमंत्रित केले आहे.
  6. उल्हासनगरमध्ये युवासेनेने सकाळी 9 वाजता शो ठेवला असेही कळवण्यात  आले आहे.
  7.  बदलापूरमध्ये शिवसेनेने एक आठवडा दररोज संध्याकाळी 6 वाजता शो ठेवला आहे, अशीही माहिती शिवसेना नेत्यांकडून देण्यात आली आहे.
  8. बहुचर्चित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा विशेष शो ठाणे येथील व्हीव्हियाना मॉल येथे पार पडणार आहे.

रिलीजआधीच केला विक्रम

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नव नवे विक्रम करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले चित्रपटाचे 30 फुटी कटआऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच शिवाय चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात आता भर पडली आहे एका लक्षवेधी अशा विक्रमाची!

मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे 16800 स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. रिलीजनंतरही हे चित्रपट अनेक विक्रम मोडणार हे यावरून आत्तापासूनच दिसून येत आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची जीवनगाथा तर बघायला मिळणारच आहे. त्याबरोबर दमदार अभिनयाची झलकही सर्वांना अनुभवायला मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.