
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील राहत्या घरी 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांना प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरातही त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. मात्र त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी या जगातून एक्झीट घेतली आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
धर्मेंद्र यांच्यावर अंतिम संस्कार मुंबईतील पवन हंस येथे करण्यात आले
दरम्यान धर्मेंद्र यांच्यावर अंतिम संस्कार मुंबईतील पवन हंस येथे करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक बॉलिवूड मंडळी स्मशानभूमीत उपस्थित होते. त्यांचे बरेचसे व्हिडीओ व्हायरलही झालेत. आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून नक्कीच सगळेच पुन्हा एकदा सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.
VIDEO | Actor Karan Deol, son of Sunny Deol, was seen carrying the ashes of his grandfather, veteran actor Dharmendra, from Mumbai’s Pawan Hans crematorium.#Dharmendra
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/BZgXdHdj25
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2025
या व्यक्तीच्या हस्ते धर्मेंद्र यांच्या अस्थी आणल्या गेल्या
हा व्हिडीओ आहे सनी देओलचा मुलगा करण देओलचा. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मेंद्र यांचा नातू करण देओल आजोबांच्या अस्थी घेण्यासाठी गेला होता. त्याचा स्मशानभूमीतला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये करण देओल स्मशानभूमीतून बाहेर पडताना दिसत आहे. त्याच्या गाडीत बसत असताना त्याच्या हातात धर्मेंद्र यांच्या अस्थी असलेला लाल कपड्यातील एक पोटली दिसत आहे. आजोबांच्या अस्थी घेऊन जात असताना तो खूप शांत आणि दुःखी दिसत आहे. त्याच्या नजरेतून हे स्पष्ट होते की धर्मेंद्र यांच्या जाण्याने देओल कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरू शकलेलं नाही.
व्हिडीओ पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली
हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा धर्मेंद्र नसल्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान याचवेळी काहींनी नाराजीही व्यक्त केली आहे. कारण धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे अंतिम दर्शन चाहत्यांना होईल, किंवा पाहायला मिळेल अशी काहीच व्यवस्था देओल कुटुंबाने केली नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.