
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र त्यांच्या तब्येतीबद्दलल पुढील अपडेट काहीच समोर आली नव्हती. पण आता मात्र त्यांच्या तब्येतीबद्दल एक माहिती नक्कीच समोर आली आहे ती म्हणजे धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात त्यांच्या टीमने आता या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले आहे.
धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याच्या बातम्या
धर्मेंद्र यांच्या टीमकडून तसेच कुटंबाकडून आलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्या आल्याच्या बातम्या म्हणजे फक्त अफवा असल्याचं म्हटलं जातं आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र 8 डिसेंबर रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत आहेत. पण अचानक त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या आणि त्यांना यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या की अभिनेत्याची प्रकृती गंभीर आहे. तथापि, अभिनेत्याच्या आणि त्यांच्या टीमच्या जवळच्या सूत्रांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.
धर्मेंद्र यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आलं?
कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे की, “धर्मेंद्र सध्या निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करणे ही फक्त एक नियमित वैद्यकीय तपासणी आहे. त्यांना यापूर्वी 31 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. पण सतत रुग्णालयात चेकअपसाठी जाणे हे त्यांच्या वयाच्या दृष्टीने त्रासदायकच आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांनी काही दिवस रुग्णालयात राहण्याचा आणि एकाच वेळी सर्व चेकअप करण्याचे निर्णय घेतले आहेत. जेणेकरून त्यांना दररोज यावे लागू नये.
“धर्मेंद्र यांच्यावर अनेक नियमित चाचण्या होत असतात….”
तसेच टीमच्या सुत्रांनी पुढे म्हटले की, “धर्मेंद्र यांच्यावर अनेक नियमित चाचण्या होत असतात, ज्या पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. 89 वर्षांच्या वयात, दररोज रुग्णालयात जाणे त्यांच्यासाठी थकवणारे आहे. म्हणून त्यांनी रुग्णालयात राहून एकदाच सर्व चाचण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.”
टीम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या या माहितीनुसार धर्मेंद्र यांची तब्येत चांगली असून त्यांना नियमित चाचण्यांसाठी रुग्णालयात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल
धर्मेंद्र हे आता वयाच्या 90 ला आले आहेत. त्याचा वाढदिवस 8 डिसेंबर रोजी आहे. पण या वयातही त्यांनी काम करणे सोडले नाही. त्यांना जमेल त्या ताकदीने काम करताना दिसतात. त्यांनी “एकिस” या चित्रपटात काम केलं आहे जो चित्रपट डिसेंबर 2025 ला रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातं. हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यावर आधारित आहे, ज्यांना 1971च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.
तसेच या चित्रपटात अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असणार असून सिमर भाटिया, जयदीप अहलावत आणि धर्मेंद्र हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.