AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra | ‘पत्नी म्हणून कशा आहेत हेमा मालिनी?’ धर्मेंद्र यांचं लक्षवेधी उत्तर

लग्नाच्या ४३ वर्षांनंतर देखील विभक्त राहतात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र... पत्नी धर्म कसा पार पाडतात हेमा मालिनी? अभिनेत्याने दिलेल्या उत्तरानंतर सर्वत्र चर्चांना उधाण

Dharmendra | 'पत्नी म्हणून कशा आहेत हेमा मालिनी?' धर्मेंद्र यांचं लक्षवेधी उत्तर
| Updated on: Jul 23, 2023 | 12:53 PM
Share

मुंबई | 23 जुलै 2023 : अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण आजही हेमा मालिनी यांना अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागते. धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने आतापर्यंत त्यांच्या दुसऱ्या कुटुंबाचा स्वीकार केलेला नाही. एवढंच नाही तर, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकत्र देखील राहत नाहीत. पण धर्मेंद्र यांचं त्यांच्या दुसऱ्या कुटुंबावर असलेलं प्रेम कायम दिसून येतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र दुसऱ्या कुटुंबावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं.

एका शोमध्ये तर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांचं भरभरुन कौतुक केलं. शोमध्ये धर्मेंद्र यांनी हेना मालिनी यांच्या स्वाभावाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘हेमा मालिनी यांनी कधीच कोणत्याचं गोष्टीची मागणी केली नाही, त्यांचा नॉन डिमांडिंग स्वभाव आहे. त्यांनी खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग केला असं देखील धर्मेंद्र म्हणाले होते.

हेमा मालिनी यांच्याबद्दल धर्मेंद्र म्हणाले, ‘हेमा मालिनी एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कधीच कशासाठी हट्ट केला नाही किंवा कोणाला नुकसान पोहोचवण्याचा देखील विचार केला नाही. हेमा मालिनी यांनी कायम दुसऱ्यांना आनंद दिला. स्वतःचं स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी इतरांच्या आनंदासाठी बलिदान दिलं..’ असं देखील धर्मेंद्र म्हणाले.

समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४३ वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.

धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेते लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात धर्मेंद्र यांच्या शिवाय, जया बच्चन, शबाना अझमी, रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

धर्मेंद्र सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धर्मेंद्र कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....