Ikkis : धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटात ‘इक्कीस’ मध्ये लाडक्या लेकाचीही एंट्री, पण मोठा ट्विस्टही..

Ikkis : येत्या काही तासांतच 2025 हे वर्ष संपून 2026 हे नवं वर्ष सुरू होणार आहे. 1 जानेवारीपासूनच सिनेमाप्रेमींना एक नवी ट्रीट मिळणार आहे. कारण ज्येष्ठ धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट "इक्कीस" हा 1 तारखेला प्रदर्शित होत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, सिमर भाटियासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे, हा सिमरचा डेब्यू असेल. पण "इक्कीस" मध्ये धर्मेंद्र एकटे नाहीत, त्यांचा मुलगाही या चित्रपटात आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ?

Ikkis : धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटात ‘इक्कीस’ मध्ये लाडक्या लेकाचीही एंट्री, पण मोठा ट्विस्टही..
"इक्कीस" चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांच्या मुलाचाही सहभाग
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Dec 31, 2025 | 10:21 AM

Ikkis : अवघ्या काही तासांत आपण 205 या सरत्या वर्षाला निरोप देऊन 2026 चं हसतमुखाने स्वागत करू. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही काही चांगल्या घटना घडल्या, तर काही दु:खद घटनांनी आपल्याला हादरवलं, रडवलं देखील. पण हे सर्व घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. विशेषतः चित्रपटांबद्दल किंवा चित्रपटसृष्टीतील त्या स्टार्सबद्दल बोलायचं झालं तर अनेकांनी यावर्षी या जगाचा निरोप घेतला. या नवं वर्षाच्या सुरूवातीलाच, 1 जानेवारी 2026 ला बॉलिवूडचे ही-मॅन अर्थात अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा बहुचर्चित “इक्कीस” हा चित्रपट येतोय. त्याची अनेक चाहते आतुरतेने वाच बघत आहे. 1 जानेवारी रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अगस्त्य नंदा आणि सिमर भाटिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र हे अगस्त्यच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबरला निधन झालं, त्यांच्या जाण्यानंतर हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. पण या चित्रपटात फक्त ऍ नव्हे तर 2-2 देओल आहेत. धर्मेंद्र यांच्या या चित्रपटात त्यांच्या लाडक्या लेकानेही वडिलांची साथ दिली आहे. पण त्यातही एक मोठा ट्विस्ट आहेच. काय आहे तो ? चला जाणून घेऊया..

अगस्त्य नंदा याचा ‘इक्किस’ हा चित्रपट खरंतर या वर्षी 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलली. आता, हा चित्रपट उद्या म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला असून मॅडॉक फिल्म्सने निर्मिती केली आहे. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटात त्यांच्या मुलाचंही काम आहे. तो मुलगा म्हणजे बॉबी देओल (Bobby Deol). आता त्याने या चित्रपटात काय काम केलंय, त्याची नक्की काय भूमिका आहे, तेही जाणूवन घेऊया.

‘इक्कीस’ मध्ये बॉबी देओलची एंट्री ?

अलिकडेच ‘इक्कीस’ शी संबंधित बिहाइंड-द-सीन्स डिटेल्स समोर आले आहेत, ज्यामुळे चित्रपटात इमोशनल लेअर आहे.अभिनेता बॉबी देओल देखील धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपटाचा भाग असेल. त्याने त्याचे वडील धर्मेंद्र यांचे काही संवाद डब केले आहेत. बॉबी देओलने त्याचे वडील धर्मेंद्र यांच्या तरुणपणीच्या आवृत्तीच्या ऑन-स्क्रीन पात्राला आवाज दिला आहे. या क्रिएटिव्ह निर्णयामुळे ‘इक्कीस’मध्ये बरंच काही खास असेल, कारण त्यामुळे ऑथेंटिसीटी म्हणजेच विश्वासार्हता असेलचपण बॉबी देओलचा आवाज हा तरूणपणाचे व्हर्जन आणखी उत्तम पणे सादर होईल. त्याचा स्क्रीनवरही चांगला इम्पॅक्ट पडेल. अलिकडेच “इक्कीस” चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग झालं.त्यानंतर पहिले काही रिव्ह्यू समोर आले आहेत. चित्रपटाची इमोशनल डेप्थ, प्रामाणिकपणा आणि शक्तिशाली कथेची समीक्षकांनी प्रशंसा केली आहे. चित्रपटाला सर्व स्तरातून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे.

या चित्रपटात बॉबी देओलचा फक्त आवाज ऐकू येणार आहे, पण तो मोठ्या पडद्यावर दिसणार नाहीये. पण धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटात त्यांच्या मुलांचही असणं खूप खास आहे. आत्तापर्यंत धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल हे अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत. ‘अपने 2’ मध्ये ते पुन्हा एकत्र दिसतील अशी आशा होती, मात्र आता ते शक्य नाही. हा चित्रपट आता कधी बनेल यावर काहीही अपडेट्स अजून तरी आलेल नाहीत.