Dhurandar : 250 कोटींचा बजेट 600 कोटींची कमाई; तरी ‘धुरंधर’मध्ये दिसल्या ‘या’ मोठ्या चुका

Dhurandar : तब्बल 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने जगभरात तब्बल 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. तरी हा ब्लॉकबस्टर चित्रपट अनेक ठिकाणी कमी पडला आहे. यातील चुका काही प्रेक्षकांनी अचूकपणे हेरल्या आहेत.

Dhurandar : 250 कोटींचा बजेट 600 कोटींची कमाई; तरी धुरंधरमध्ये दिसल्या या मोठ्या चुका
अक्षय खन्ना, संजय दत्त
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 21, 2025 | 8:41 AM

सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत ‘धुरंधर’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज असली तरी प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसह इतरही कलाकारांच्या यात भूमिका आहेत. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी इतक्या मोठ्या प्रमाणावर होतेय, की त्यामुळे आपोआप प्रेक्षक ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सोशल मीडियावर इतके पोस्ट, रील्स, व्हिडीओ, मीम्स पाहिल्यानंतर FOMO म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ जाणवू लागल्यानेही (एखादी गोष्ट सर्वजण करत असतील तर आपण त्यात मागे राहतोय अशी भावना मनात निर्माण होणं) अनेकजण ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. ‘धुरंधर’ने जगभरातील प्रेक्षकांना मोहीत केलं आहे. राजकारण, गुन्हेगारी, सत्तेची धोकादायक जुगलबंदी, रेहमान डकैतची दहशत या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा