Dhurandhar : खऱ्या रेहमान डकैतचा मित्रसुद्धा ‘धुरंधर’च्या प्रेमात; सिनेमा पाहून पाकिस्तानबद्दल स्पष्टच म्हणाला..

Dhurandhar : रेहमान डकैतचा मित्रसुद्धा 'धुरंधर'च्या प्रेमात... रेहमान नसता तर, पाकिस्तानची अवस्था कशी असती? 'धुरंधर' नंतर अनेक गोष्टी समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'धुरंधर' सिनेमाची चर्चा...

Dhurandhar : खऱ्या रेहमान डकैतचा मित्रसुद्धा धुरंधरच्या प्रेमात; सिनेमा पाहून पाकिस्तानबद्दल स्पष्टच म्हणाला..
रेहमान डकैत
| Updated on: Dec 29, 2025 | 12:49 PM

Dhurandhar : दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा एका काल्पनीक कथेवर आधारलेला असला तरी, सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. हा एक स्पाय थ्रिलर सिनेमा पाकिस्तानातील ल्यारी टाउनमधील आहे, जो कराचीमधील एक परिसर आहे आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला टोळी हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध होता. सिनेमामध्ये अभिनेता अक्षय कुमार याने रेहमान डकैत याची भूमिका साकारली आहे. जे पाकिस्तानमधील कुख्यात गुंड होता. सिनेमात खऱ्या पात्रांना कसं साकारण्यात आलं आहे, यावर अनेक चर्चा झाल्या असताना, आता खऱ्या रेहमानच्या एका मित्राने सिनेमाचंकौतुक केले आहे.

‘धुरंधर’ सिनेमाबद्दल काय म्हणाला रेहमान डकैत याचा मित्र?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हबीब जान बलूच… जे एक वकील आणि बलुच राष्ट्रवादी आहे. एका मुलाखतीत हबीब याला धुरंधर सिनेमाबद्दल विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ‘मी सिनेमा दोन वेळा पाहिला आहे. मी सिनेमातील भुमिकांबद्दल काही बोलणार नाही. सिनेमांमध्ये असं होतंच… पण मला एक गोष्ट बोलायला आवडेल, ती म्हणजे, जे पाकिस्तान करु शकला नाही, ते भारताना करुन दाखवलं आहे…’ असं म्हणत त्याने बॉलिवूडचे आभार देखील मानले…

पुढे हबीब रेहमान याच्याबद्दल म्हणाला, ‘तो एक हिरो आणि चांगला व्यक्ती होता… पाकिस्तान त्याचा ऋणी आहे. जर रेहमान आणि उजैर बलोच नसते तर पाकिस्तानची अवस्था आज बांगलादेशसारखी झाली असती किंवा त्याहूनही वाईट झाली असती. माझ्या मते सिनेमा कोणत्याच पक्षाच्या विरोधात नाही.’ असं देखील हबीब बोलला.

सांगायचं झालं तर, पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सदस्यांनी धुरंधर सिनेमावर टीका केली आहे आणि म्हटलं आहे की, सिनेमात त्यांच्या पक्षाचे वाईट चित्रण करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धुरंधर सिनेमाची चर्चा सुरु आहे. सर्वच स्तरातून सिनेमातं कौतुक होत आहे.

गेल्या 4 आठवड्यांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. धुरंधर सिनेमात, रणवीर सिंग एका भारतीय गुप्तहेराची भूमिका करतो जो 2000 च्या दशकात ल्यारीमध्ये रेहमानच्या टोळीत घुसखोरी करतो. संजय दत्तने पोलीस अधीक्षक (एसपी) असलमची भूमिका देखील केली आहे, जो एक वास्तविक जीवनातील पोलीस अधिकारी आहे. सिनेमात अभिनेता आर माधवन आणि अर्जुन रामपाल यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे.