AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर : द रिव्हेंज’चा ओटीटीवर धमाका; पहिल्याच आठवड्यात रचला मोठा विक्रम

रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच धमाका केला आहे. ओपनिंग वीकेंडला या चित्रपटाने ओटीटीवर मोठा विक्रम रचला आहे. 4 जूनपासून हा चित्रपट जियो हॉटस्टारवर स्ट्रीम होतोय.

'धुरंधर : द रिव्हेंज'चा ओटीटीवर धमाका; पहिल्याच आठवड्यात रचला मोठा विक्रम
रणवीर सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2026 | 12:17 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घातला आहे. थिएटरमध्ये पाहिल्यानंतरही अनेकांनी हा चित्रपट पुन्हा ओटीटीवर पाहण्यासाठी धाव घेतली आहे आणि यामुळे पहिल्याच वीकेंडला मोठा रेकॉर्ड बनला आहे. ‘जियो हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहच्या या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्येच 5 कोटी प्रेक्षक खेचून आणले आहेत. त्यामुळे या स्ट्रीमिंग साइटवर हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा डिजिटल लाँच बनला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 83 दिवसांपर्यंत म्हणजेच जवळपास 12 आठवड्यांपर्यंत थिएटरमध्ये चालला. त्यानंतर ओटीटी आल्यावरही मोठ्या संख्येने प्रेक्षक तो पाहू लागले.

हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘धुरंधर 2’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओपनिंग वीकेंडमध्ये प्रेक्षकांनी जेवढी गर्दी केली होती, त्यापेक्षा पाच पटींनी जास्त ओटीटीवर प्रेक्षकवर्ग पोहोचला आहे. या रिपोर्टनुसार, ‘धुरंधर 2’ पाहण्याच्या एकूण वेळेपैकी जवळपास 60 टक्के वेळ कनेक्टेड टीव्ही उपकरणांवरून पाहिला गेला आहे. एकंदरीत या चित्रपटाला थिएटरमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

‘जियो हॉटस्टार’ने सांगितलं की प्रेक्षकांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी त्यांनी चित्रपटाची ‘रॉ’ (कच्ची) किंवा न पाहिलेली आवृत्ती आणि 30 मिनिटांचा प्री-शो सेगमेंटदेखील सादर केला. या सेगमेंटमध्ये पडद्यामागील दृश्ये आणि कलाकारांसोबतचा संवाद यांचा समावेश होता. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ने पहिल्या तीन दिवसांतच ‘धुरंधर’ या पहिल्या भागाच्या ओटीटी ओपनिंगचाही विक्रम मोडला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेच ओटीटीवर प्रेक्षकांची संख्या जवळपास पाच पटीने जास्त आहे.

जगभरातील थिएटर्समध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दुसरा भाग 4 जून 2026 रोजी जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. 2025 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटानंतर दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. त्यानंतर हा दुसरा भाग ओटीटीवर कधी येणार, याचीही प्रतीक्षा जगभरातील प्रेक्षक करत होते. जियो हॉटस्टारने 50 हून अधिक ब्रँड पार्टनर्स आणि 30 मिनिटांच्या प्री-शो इव्हेंटसह या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ‘रॉ अँड अनदेखा’ या विशेष डिजिटल प्रीमिअरच्या रुपात प्रसिद्धी दिली.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!