Dhurandhar 2 Box Office Collection : ‘धुरंधर 2’ रेकॉर्ड कमाईच्या दिशेने, दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कलेक्शनचा आकडा आला समोर

Dhurandhar 2 Box Office Collection : आज धुरंधर द रिव्हेंज देशभरातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ आहे. चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यातून ते समोर येत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतच या चित्रपटाने तब्बल इतक्या कोटींची कमाई केली आहे.

Dhurandhar 2 Box Office Collection : धुरंधर 2 रेकॉर्ड कमाईच्या दिशेने, दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कलेक्शनचा आकडा आला समोर
dhurandhar the Revenge
| Updated on: Mar 19, 2026 | 2:41 PM

आज गुढी पाडव्याच्या मुहू्र्तावर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ चा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे या चित्रपटाची धूम दिसून येत आहे. थिएटरमध्ये हाऊस फुलचे बोर्ड झळकले आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह, क्रेझ दिसून येत आहे. काल चित्रपटाचे प्रिव्यु शो झाले. त्याला सुद्धा तुफान प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी टेक्निकल समस्येमुळे शो रद्द करावे लागले. आजपासून अधिकृतपणे हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुसाट निघाला असून दुपारी 12 वाजेपर्यंत भारतात या चित्रपटाने 60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रिव्यू शो आणि मॉर्निंगच्या कमाईचा मिळून हा आकडा आहे. पठाण, स्त्री 2 आणि वॉर या चित्रपटांचा कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ ने केवळ प्रिव्यू शोमधूनच भारतात तब्बल 44 कोटी रुपयांची कमाई केली.

धुरंधर च्या पहिल्या पार्टने 28 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ पहिल्या दिवशीच्या कमाईचा हा आकडे मागे टाकणार हे निश्चित आहे. पहिल्या चार दिवसातच हा चित्रपट 100 कोटीचा टप्पा पार करेल असं चित्र आहे. कारण धुरंधरचा पहिला पार्ट खूप रंजक वळणार संपला होता. रेहमान डकैतनंतर आता त्याची ल्यारी आणि हमझा मझारी यांचं पुढे काय होणार?. बडे साहब कोण? या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक आहेत. बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचे आकडेच चित्रपटाच्या क्रेझ बद्दल सर्वकाही सांगून जात आहेत.

मधुर भांडारकर यांनी काय लिहिलय?

चांदनीबार, पेज थ्री सारखे चित्रपट बनवणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी आदित्य धरचं भरभरुन कौतुक केलं आहे. “काल रात्री मी 3 तास 49 मिनिटांचा जबरदस्त चित्रपट धुरंधर 2 पाहिला. माझं डोकं अजूनही चक्रावलं आहे. मोठ्या बजेटच्या सीक्वलला कसं यशस्वी बनवायचं त्याचं हे उत्तम उदहारण आहे. आदित्य धरचं विजन प्रत्येक फ्रेम विजेसारखी प्रभावी आहे. चित्रपटाचा वेग कुठेही थांबत नाही. सगळ्या कास्टने जबरदस्त काम केलय. रणवीर सिंह तर पूर्णपणे वेगळाच आहे. माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीयत” असं मधुर भांडारकर एक्सवरच्या पोस्टमध्ये लिहिलय.

 

Follow Us