सीरिजमध्ये असे काही सीन जे करताना अभिनेत्रीची वाईट अवस्था, म्हणाली “मी कधीही विसरू शकणार नाही..”
एका सीरीजमध्ये अशी काही सीन आहेत की ते करताना या बॉलिवूड अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. तो सीन करताना ती एवढी घाबरली होती की तिला चक्कर आल्यासारखं वाटंल अन् जणू काही त्या सीनचा तिला ट्रोमा बसला.
चित्रपटांमध्ये अनेक असे काही सीन असतात जे करताना अभिनेत्रींना त्रास होतो. विशेषत: जर तो एखादा इंटिमेट सीन असेल किंवा रेप सीन असेल तर अभिनेत्रींना मानसिक तयारीही करावी लागते. अशाच एका रेप सीन दरम्यान एका अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. ही अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा. दियाने तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याने देखील सर्वांना भुरळ घातली आहे.’धक धक’ आणि ‘नादनिया’मध्ये तिने भूमिका साकारल्यानंतर आता ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या ‘काफिर’ या वेब सिरीजद्वारे सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. तिच्या अभिनयाचे कौतुकही केले जात आहे.
अभिनेत्रीचा सीनदरम्यानचा किस्सा
आता ही सीरीज चित्रपटाच्या रूपात एका नवीन अवतारात प्रदर्शित होणार आहे. ही कथा एका पाकिस्तानी महिलेची आहे, ज्याची भूमिका दिया मिर्झा साकारत आहे. चित्रपटात तिच्या पात्राचे नाव कैनाज आहे आणि ती चुकून सीमा ओलांडून भारतात येते, त्यानंतर तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आता दिया मिर्झाने या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल सांगिताना अनेक किस्से सांगितले त्यातील एक किस्सा म्हणजे तिच्या रेप सीनचा. या सीनवेळी तिची जी वाईट अवस्था झाली होती त्याबद्दल तिने सांगितलं.
‘काफिर’ या सीरिजमध्ये अनेक हृदयद्रावक दृश्ये
‘काफिर’ या सीरिजमध्ये अनेक हृदयद्रावक दृश्ये आहेत, ज्यासाठी दिया मिर्झाचे समीक्षकांनीही कौतुक केले होते. तिच्या अनेक दृश्यांनी प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. तिने सांगितले की असे अनेक सीन्स होते, जे करताना ती मानसिकदृष्ट्या खचली होती. विशेषतः बलात्काराच्या दृश्यादरम्यान तिच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते खूप कठीण होते. दियाने तिच्या शूटिंगशी संबंधित एक किस्सा सांगितला.
दृश्यादरम्यान अभिनेत्रीची वाईट अवस्था का झाली?
‘काफिर’ चित्रपटातील बलात्काराच्या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यानच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलताना दिया म्हणाली की तिला अजूनही तो बलात्काराचा सीन आठवतो. त्या दृश्यादरम्यान ती खूप थरथरत होती. यानंतर तिला उलट्या होत होत्या. हे सीन करताना तेव्हाची परिस्थिती तिच्यासाठी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होती. दिया म्हणते की जेव्हा एखादी परिस्थिती प्रत्यक्षात आणली जाते तेव्हा ती अभिनय करताना जाणवते.
‘काफिर’ मालिकेतील तिच्या कैनाज या व्यक्तिरेखेबद्दल दिया मिर्झाने सांगितले की, तिला या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले आहे. तिचा असा विश्वास आहे की एक अभिनेता म्हणून आपल्याला वाटणारी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडद्यावर साकारणाऱ्या पात्राबद्दल आपुलकी असणे. जेणेकरून त्या पात्राच्या माध्यमातून कथा पडद्यावर सत्यतेने दाखवता येईल.