Dhanashree Verma : सगळे स्पोर्ट्स चॅनल्स बंद.. धनश्री वर्माचा पूर्व पती युजवेंद्र चहलवर निशाणा ?

Dhanashree Verma Video Viral : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे वेगळे होऊन बराच काळ लोटला असला तरी त्यांच्या विभक्त होण्याचं कारण त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायची इच्छा अजूनही आहे.सध्या प्रोफेशनल आयुष्यावर पोकस करणारी धनश्री वर्मा लवकरच अमेझॉन एमएक्स प्लेअरच्या राइज अँड फॉल या शोमध्ये दिसणार आहे. नुकताच त्याचा एक प्रोमो समोर आला असून त्यामध्ये धनश्रीने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांचया भुवया उंचावल्या आहेत. तिने तिचा पूर्व पती युजवेंद्र चहलला टोमणा मारल्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत.

Dhanashree Verma : सगळे स्पोर्ट्स चॅनल्स बंद.. धनश्री वर्माचा पूर्व पती युजवेंद्र चहलवर निशाणा ?
धनश्री वर्मा- युजवेंद्र चहल
Image Credit source: social media
| Updated on: Sep 01, 2025 | 9:45 AM

Dhanashree Verma : युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचं नात संपून बरेच महिने उलटले असले तरी घटस्फोटानंतरही विवाद अद्याप कायम आहे. क्रिकेटर चहलच्या अनेक चाहत्यांनी धनश्रीला प्रचंड ट्रोल केलं आहे. तर दुसरीकडे एका पॉडकास्टद्वारे चहलनेही लग्न आणि घटस्फोटावर बरंच भाष्य केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून धनश्रीही बरंच काही बोलली. घटस्फोटाच्या दिवशी काय घडले हे तिने सांगितलं. त्यादिवशी चहलने घातलेल्या शुगर डॅडी टी-शर्ट वर तिची प्रतिक्रिया काय होती हे देखील धनश्रीने नमूद केलं. त्यामुळे हे माजी जोडपं अजूनही चर्चेत असतंच.

त्यात आता धनश्री वर्मा ही एका रिॲलिटी शोमध्ये झळकणार असून ‘राइज अँड फॉल’ असं त्याचं नाव आहे. या शोमध्ये एकूण 16 स्पर्धक भाग घेणार असून ‘राइज अँड फॉल’ हा शो MX प्लेअरवर दिसणार आहे. या शोचा एक प्रोमो समोर आला असून त्यामध्ये धनश्री ही तिचा पूर्व पती चहलला टोमणा मारताना दिसली.

धनश्रीने बंद केली स्पोर्ट्स चॅनेल्स

‘राइज अँड फॉल’ शोमध्ये धनश्रीची नयनदीप रक्षितसोबत तूतू-मैंमैं मध्ये म्हणाली की तिनेतिने सगळेच स्पोर्ट्स चॅनेल्स बंद करवले आहेत. या शोचा फॉरमॅट असा आहे की स्पर्धकांना दोन अतिशय वेगळ्या जगात एकमेकांविरुद्ध उभे केले आहे. काही जण “शासक” म्हणून एका आलिशान पेंटहाऊसमध्ये राहतील, तर काही जण “कामगार” म्हणून तळघरात काम करतील. पेंटहाऊसची शिडी चढण्यासाठी आणि आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्व 16 स्पर्धकांमध्ये लढाई होत राहील.

‘राईज अँड फॉल’ च्या आतापर्यंतच्या कन्फर्म झालेल्या नावांच्या यादीत अर्जुन बिजलानी, किकू शारदा, कुब्रा सैत, नयनदीप रक्षित आणि धनश्री वर्मा या सेलिब्रिटींचा समावेश आहे. ताज्या प्रोमोमध्ये, धनश्री तिचा प्रतिस्पर्धी नयनदीप रक्षितला सांगते की ती क्वीन आहे आणि राणीला स्टार बनण्याची गरज नाही. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांची तिच्यासमोर लाईन लागली आहे. नंतर ती अचानक म्हणाली की मी सगळे स्पोर्ट्स चॅनेल्स बंद करून टाकले. मात्र तिचं हे विधान म्हणजे तिचा पूर्व पती, क्रिकेटर युजवेंद्र चहलशी निगडीत असल्याचं बोललं जात आहे. या विधानाद्वारे तिने चहलवर निशाणा साधत त्याला टोमणा मारला असा दावा अनेक यूजर्सनी केला आहे. 6 सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये या स्पर्धकांचे कोणते रंग दिसतील हे पाहणे मनोरंजक असेल.

 

धनश्री-चहलचं लग्न

2020 साली लग्न झालेल्या धनश्री आणि युजवेंद्र चहल यांचा या वर्षी फेब्रुवारीमध्ये घटस्फोट झाला. वेगळे झाल्यानंतर दोघांनीही मीडियामध्ये एकमेकांबद्दल अनेक विधाने केली. काही काळापूर्वी दिलेल्या मुलाखतीत धनश्रीने युजवेंद्रच्या ‘बी युअर ओन शुगर डॅडी’ या कमेंटवरही प्रतिक्रिया दिली होती. तर चहलही घटस्फोटाबद्दरल, लग्नाबद्दल बरंच काही बोलला होता.