प्रियंका-निकने लाडक्या लेकीसाठी घेतला मोठा निर्णय; बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी आपल्या मुली मालतीच्या भविष्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. मालतीला शोबिजमध्ये येण्यास त्यांनी सक्ती करणार नाहीत, तर तिच्या स्वप्नांना आणि आवडीला प्रोत्साहन देतील. मालतीला गाणे आवडते, पण तिचे करिअर ती स्वतः निवडेल असे निकने स्पष्ट केले आहे.

प्रियंका-निकने लाडक्या लेकीसाठी घेतला मोठा निर्णय; बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा
Priyanka Chopra
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 13, 2025 | 6:56 PM

बॉलिवूडमध्ये 80 टक्के कलाकारांची मुलं बॉलिवूडमध्ये येऊन करिअर करतात. काही बॉलिवूड कलाकारांची मुलं मात्र वेगळ्या क्षेत्रात काम करणं पसंत करतात. असं असलं तरी अनेक सेलिब्रिटींना आपल्या मुलांच्या करिअरची चिंता सतावत असते. मुलं लहान असतानाच त्यांच्या करिअरचा सेलिब्रिटी विचार करत असतात. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनाही त्यांची लाडकी कन्या मालतीची चिंता सतावू लागली आहे. मालती अवघी तीन वर्षाची आहे. मात्र, आतापासूनच या दाम्पत्यांना लेकीची चिंता सतावू लागली आहे.

मालती ही एक चर्चेतील स्टार किड आहे. त्यामुळेच आपल्या मुलीचं भविष्य आपल्यासारखंच सुखकर असावं असं या दोघांना वाटत आहे. म्हणून या दोघांनी मुलीसाठी एक खास निर्णय घेतला आहे. नुकताच निक एका शोमध्ये गेला होता. यावेळी दोघांनी आपल्या मुलीच्या फ्युचरवर भाष्य केलं. मालती शोबिजमध्ये एन्ट्री करणार का? असा सवाल या दोघांना करण्यात आला. त्यावर निकने जे उत्तर दिलं त्यावरू बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

वाचा: रिकाम्या खूर्चीशी 2 तास गप्पा मारत होता अभिनेता, सेटवरील लोकंही झाले चकीत; नेमकं काय झालं होतं वाचा

मालती शोबिजमध्ये येणार

निक आणि प्रियंका या दोघींप्रमाणेच मालतीही शोबिजमध्ये येणार का? अशी सध्या निक आणि प्रियंकाच्या फॅन्समध्ये चर्चा आहे. ‘द केली क्लार्कसन’ या शोमध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मनोरंजन हे एक चांगलं करिअर आहे असं म्हटलं. पण तिला काय करायचं हे मालतीच ठरवेल. आम्ही नाही, असं निक म्हणाला. आम्ही यावर भरपूर विचार केला आहे, असंही त्याने सांगितलं. हे सांगतानाच आमच्या तीन वर्षाच्या मालतीला गाणं गायला आणि ऐकायला खूप आवडतं, असंही त्याने सांगितलं.

तिने तिच्या मर्जीने करावं

मी आणि प्रियंकाने करिअरमध्ये बरंच काही पाहिलं आहे. आमच्या मुलीनेही त्याच गोष्टीचा सामना करावा असं आम्हाला वाटत नाही. मुलांचं संरक्षण करणं हे आईवडिलांचं काम असतं. त्यामुळेच त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने आणि मोकळेपणाने जगू द्यावं, असं सांगतानाच मालतीने जे करायचं ते आपल्या मर्जीने करावं, असंही त्याने सांगितलं.

सरोगेसीने जन्म

प्रियंका आणि निकने 2018मध्ये राजस्थानच्या उदयपूर येथे हिंदू आणि क्रिश्चियन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर 2022मध्ये मालतीचा जन्म झाला. 15 जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे तिचा जन्म झाला होता. आता मालती तीन वर्षाची झाली आहे. मात्र, एवढ्या छोट्या वयातही ती चर्चेत असते.