Vijay -Trisha : ना बर्थडे विश, ना काही पोस्ट.. थलपती विजय यांना त्रिशाने केलं अनफॉलो ? त्या कृतीमुळे खळबळ

त्रिशा कृष्णनने सोशल मीडियावर थलपती विजय यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने आणि अनफॉलो केल्याच्या चर्चा सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या अनेक दशकांच्या मैत्री आणि ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीनंतर ही कृती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अफवांदरम्यान हा प्रकार घडल्याने त्यांच्यातील नात्यात काहीतरी बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vijay -Trisha : ना बर्थडे विश, ना काही पोस्ट..  थलपती विजय यांना त्रिशाने केलं अनफॉलो ?  त्या कृतीमुळे खळबळ
विजय यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिशाने काहीच पोस्ट केली नाही
| Updated on: Jun 23, 2026 | 2:26 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे, सोशल मीडियावरही तिच्याबद्दल बरीच चर्चा होत असते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबत तिचं नवा सतत जोडलं जात असतं. ते दोघे अनेकदा सोबतही दिसले, थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ती आली होती. थलपती विजय यांचा 52 वा वाढदिवस नुकताच झाला. मात्र यावेळी त्रिशाने त्यांना शुभेच्छा देणारी एकही पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली नाही, आणि त्यातच आता अशी चर्चा सुरू झाली आहे की त्रिशाने विजय यांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. यामुळे मोठी खळबळ माजली असून चर्चांना उधाण आलंय.

त्रिशाने गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच विजय यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही पोस्ट केली नाही. अनेक दशकांपासून त्रिशा कृष्णन आणि विजय हे दोघे, तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडती ‘ऑन-स्क्रीन’ जोडी राहिले आहेत. हे. मात्र, या आठवड्यात परिस्थिती बदललेली दिसली. काल म्हणजेच 22 जून विजय यांचा वाढदिवस होता; मात्र त्रिशाने त्यांना शुभेच्छा देणारी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही, उलट तिने शांतपणे त्याला ‘अनफॉलो’ केलं, अशी चर्चा रंगली आहे. तिच्या ‘फॉलोइंग’ लिस्टमधून विजय यांचं नाव गायब झाल्याचे चाहत्यांच्या लक्षात आलं. इतर कोणाला ही कदाचित एक छोटी गोष्ट वाटू शकते, पण ऑनलाइन जगात या कृतीला खूप महत्त्व असतं; विशेषतः अशा कलाकारांच्या बाबतीत ज्यांनी गेल्या वीस वर्षांत मित्र, प्रेमी आणि त्यापलीकडील अनेक नाती पडद्यावर साकारली आहेत. त्रिशाने खरचं त्यांना अनफॉलो केलं आहे का, त्यांच्यात काय बिनसलं अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

अनेक वर्ष एकत्र केलं काम

गेल्या वर्षी आणि त्याआधीही, त्रिशाने विजय यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते आणि त्यांना ‘मित्र’ व ‘दिग्गज कलाकार’ (लेजेन्ड) असं संबोधलं होतं. ही जोडी काही अलीकडच्या काळातील नवीन आकर्षण नाही. 2004 पासून ‘घिल्ली’ (Ghilli) चित्रपटापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि ‘तिरुपाची’ (Thirupaachi), ‘कुरुवी’ (Kuruvi), ‘लिओ’ (Leo) व अलीकडील ‘गोट’ (GOAT) यांसारख्या चित्रपटांतून त्यांची ही केमिस्ट्री कायम राहिली. त्यांच्या भूमिका रोमँटिक असोत वा नसोत, चाहत्यांनी त्या नेहमीच डोक्यावर घेतल्या .

अनफॉलो केल्यावर चाहत्यांनी केलं नोटीस

पडद्याबाहेर त्रिशा आणि विजय यांनी नेहमीच आपण मित्र असल्याचे सांगितलं; मात्र गेल्या काही महिन्यांत, विशेषतः विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या अफवा पसरल्यानंतर, त्यांच्यातील संबंधांत ‘काहीतरी बदल होत असल्याच्या’ चर्चांना उधाण आलं. या अफवांबाबात विजय किंवा त्रिसा, दोघांपैकी कोणीच अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. मात्र असं असलं तरीही एखाद्याला ‘अनफॉलो’ करणे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा न देणे या गोष्टी एक स्पष्ट संकेत मानल्या जातात. “काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय तुम्ही तीन वर्षांच्या मैत्रीनंतर आपल्या मित्राकडे दुर्लक्ष करत नाही.” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

मात्र असं असलं तरी इन्स्टाग्रामवरील या कृतीबाबात किंवा वाढदिवसाची पोस्ट न करण्याबाबात त्रिशा किंवा विजय यांपैकी कोणीही काहीही भाष्य केलेले नाही. सोशल मीडियाच्या बाबतीत हे दोघेही खूप सावध असतात. त्रिशाला जेव्हा मनापासून काही सांगायचं असतं, तेव्हाच पोस्ट करते. दुसरीकडे, राजकीय जीवनात व्यस्त असूनही विजय हे मात्र आपलं अकाउंट नियमितपणे अपडेट करत असतात. त्यामुळे आता त्रिशाने असं का केलं,तिने खरंच अनफॉलो केलं का असे प्रश्न चाहत्यांना सतावत असून सर्वांचे लक्ष दोघांकडे लागलं आहे.

Follow Us