AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिले मुद्देसूद उत्तर!

माझ्या मतदारसंघात किती निधी मिळाला, याची माहिती वाहिन्या देत आहेत. माझ्या मतदारसंघाला 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघात 130 कामे आहेत जी प्रस्तावित आहेत. त्यातील 21 कामे पूर्ण झाली आहेत आणि त्याचा निधी वितरित झाला आहे, अशी माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिले मुद्देसूद उत्तर!
omraje nimbalkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 3:23 PM
Share

Omraje Nimbalkar : ठाकरे यांच्या सहा आमदारांनी बंडखोरी केल्यानंत राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व सहा खासदारांनी विकास कामे रखडत होती, निधी कमी  पडत होता, असे कारण देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. जनतेच्या हितासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचेही बंडखोर खासदार सांगत आहेत. दरम्यान, एकीकडे खासदार विकास निधी आणि विकासकामांचा दावा करत असताना दुसरीकडे या खासदारांनी मिळालेल्या खासदार निधीचा पुरेपूर वापरच केलेला नसल्याचे समोर आले आहे. याच मुद्द्याला समोर आणून खासदारांनी नेमकी बंडखोरी का केली? बंडखोरीचे फक्त कारण दिले जात आहे? असा आरोप ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात आहे. दरम्यान, आता यावरच बंडखोरी केलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ओमराजे यांनी मिळालेल्या खासदार निधीची माहिती दिली आहे.

ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?

खासदार निधीवरून वेगवेगळे आरोप केले जात असताना ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिक मांडली तसेच खासदार निधी आणि त्याचा वापर कसा केला, याविषयीही त्यांनी सविस्तर सांगितले. माझ्या मतदारसंघात किती निधी मिळाला, याची माहिती वाहिन्या देत आहेत. माझ्या मतदारसंघाला 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघात 130 कामे आहेत जी प्रस्तावित आहेत. त्यातील 21 कामे पूर्ण झाली आहेत आणि त्याचा निधी वितरित झाला आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

मुदत संपल्यानंतर निधी शिल्लक राहिला तर…

तसेच, बाकीची कामे प्रगतीपथावर आहेत. खासदार निधीवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. मी 2019 ते 24 मी खासदार होतो. खासदार निधी खर्च करण्याची मुदत 5 वर्षांची असते. त्यामुळे कुठल्याही निधीचे मुल्यमापन करत असताना या निधीली किती वर्षाची मुदत आहे, ते पाहिले पाहिजे. मुदत संपल्यानंतर निधी शिल्लक राहिला तर निश्चितपणे संबंधित खासदाराचे अपयश आहे. मुद्दा दोन पाच वर्षात मला 2019 ते 24 या काळात जो खासदार निधी मिळाला त्यातील एकही रुपया शिल्लक नाही. निधीतील एक रुपयाही अखर्चित राहिलेला नाही, असेही ओमराजे यांनी स्पष्ट केले.

एका लाखात कोणते काम होते?

पुढे बोलताना, माझ्या लोकसभेत येणाऱ्या बुथची संख्या 2475 एवढी आहे. एका वर्षात खासदार निधी पाच कोटी रुपये मिळतो. पाच वर्षात 25 कोटी निधी झाला. 25 कोटी खासदार निधीला 2475 बुथने भागले तर एका बुथला एका बुथला 1 लाख 3000 रुपये मिळते. एका लाखात कोणते काम होते, हे मला सांगा, असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!