AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, 8 दिवस..

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटातून मोठी बंडखोरी केली. एकाच वेळी तब्बल 6 खासदारांनी ही बंडखोरी केली. त्यानंतर या खासदारांना संरक्षण देण्यात आले. आता यादरम्यानच मोठी माहिती पुढे येत आहे.

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, 8 दिवस..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 23, 2026 | 12:29 PM
Share

शिवसेना शिंदे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर सर्व खासदारांना अज्ञातस्थळी हालवण्यात आले. हे खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात होते. ओमराजे निंबाळकर यांनी देखील शिवसेना पक्षातून मोठी बंडखोरी केली. पण त्यांच्या वडिलांच्या केसचा निकाल असल्याने त्यांनी पुणे सोडले नाही. मुंबईमध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला. हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लागला. मात्र, ज्यावेळी ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबासोबत कोर्टात होते, त्यावेळी शिवसैनिक ठाकरे गट कोर्टाबाहेर गर्दी करत होता. काही काळ तणावाचे वातावरण होते. हेच नाही तर मुंबईहून पुण्यात परतल्यानंतरही ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक जमले होते.

पोलिसांनी मोठा निर्णय घेत थेट ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली. त्यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवली. यादरम्यानच आता सरकारने मोठा निर्णय घेत ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी पुढील आठवडाभर सुरक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. बंदोबस्त वाढवण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूचना दिल्या. दिवसा एक अधिकारी आणि 5 पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत.

6 बंडखोरी केलेल्या खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून ऑपरेशन तुडवाची धमकी देण्यात आली. याला या खासदारांनी उत्तर दिले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. पण ते आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधूनच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सहा खासदारांच्या मतदार संघात दाैरा करण्याचा निर्णय घेतला. 26 तारखेला उद्धव ठाकरे धाराशिव दाैऱ्यावर असणार आहेत. या दाैऱ्याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्याकडूनही शिवसेना शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात वाढवण्याकरिता प्रयत्न केली जाणार आहेत. ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. पक्षांतराच्या मुद्द्यात आपल्या मनातील भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना ओमराजे निंबाळकर दिसले.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!