Eknath Shinde On Thackeray | कोण होतास तू, काय झालास तू…; विधानसभेत शिंदेंकडून कविता म्हणत टोलेबाजी
राज्य विधानसभेत आज बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अलीकडील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत शिंदे यांनी विरोधकांना आणखी धक्के बसणार असल्याचा इशारा दिला.
राज्य विधानसभेत आज बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अलीकडील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत शिंदे यांनी विरोधकांना आणखी धक्के बसणार असल्याचा इशारा दिला.
सभागृहात भाष्य करताना शिंदे म्हणाले की, “काल दिलेल्या झटक्यामुळे काहींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. अजूनही त्यांना तो धक्का पचलेला नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी शिंदे यांनी काव्यात्मक शैलीतही विरोधकांवर निशाणा साधला. “कोण होतास तू, काय झालास तू… अरे वेड्या असा वाया गेलास तू,” असे म्हणत त्यांनी टोलेबाजी केली. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी बाकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.
तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यास सरकार तयार असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर सभागृहात थांबा. आम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहोत.”
दरम्यान, अलीकडील पक्षांतर आणि राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारण तापलेले असताना शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Published on: Jun 23, 2026 02:37 PM
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला

