कुष्ठरोगाचे उपचार घेत असताना अभिनेत्रीने दिला रोमँटिक हिट चित्रपट; रातोरात स्टार बनली बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जी पहिल्याच चित्रपटानंतर रातोरात स्टार झाली. पण त्यावेळी ती कुष्ठरोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. पण तरीही तिने पहिलाच रोमांटीक चित्रपट दिला आणि तो सुपरहीट झाला. आजही आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री.

कुष्ठरोगाचे उपचार घेत असताना अभिनेत्रीने दिला रोमँटिक हिट चित्रपट; रातोरात स्टार बनली बॉलिवूड अभिनेत्री
dimple kapadia
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2025 | 1:04 PM

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेत्री आहेत ज्या अनेक आजारांशी झुंज देऊन त्यातून बऱ्या झाल्या आहेत आणि पुन्हा जोमाने कामाला लागल्या आहेत. त्यांनी आजारावर मात करत त्यांचं करिअप एका उंचीला नेऊन ठेवलं. अशीच एक बॉलिवूडची अभिनेत्री आहे जिने तिच्या अशाच एका गंभीर आजाराशी झुंज देत हिट चित्रपट दिले. आणि नंतर ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनली.

या अभिनेत्री आहे जिने वयाच्या 15 व्या वर्षी एक हिट चित्रपट दिला. पण नंतर असे काही घडले की तिने चित्रपटांना अलविदा म्हटलं. कारण ही अभिनेत्री बालपणीच गंभीर आजाराने ग्रस्त होती. या अभिनेत्रीला 12 व्या वर्षीच कुष्ठरोग झाला होता. तरीही तिने पहिलाचा चित्रपट हिट दिला आणि रातोरात स्टार झाली. ही अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. डिंपल यांनी फक्त 14 वर्षांची असताना बॉबीसाठी स्क्रीन टेस्ट दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आणि त्या रातोरात स्टार बनल्या.

अभिनेत्री या गंभीर आजाराशी झुंजत होती  

फार कमी लोकांना माहिती आहे की स्टार होण्यापूर्वी डिंपल या गंभीर आजाराशी झुंजत होत्या. त्यांनी स्वत:हा एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. त्या 12 वर्षांची असताना त्यांना कुष्ठरोग झाला होता. ज्याचा परिणाम तिच्या कोपरांवर दिसून येत होता. याच काळात राज कपूरला तिच्याबद्दल कळले आणि त्यांनी डिंपलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

उपचाराद्वारे त्यांचा हा आजार बराही झाला

राज कपूरला एका सुंदर मुलीबद्दल सांगितले गेले जी या आजाराने ग्रस्त आहे आणि जेव्हा त्यांनी डिंपलला पाहिले तेव्हा त्याने तिला ‘बॉबी’ साठी निवडले. डिंपल म्हणते की तो काळ तिच्यासाठी पूर्णपणे जादूचा होता. तिला जे हवे होते ते तिला मिळालं होतं, जणू काही ते एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे घडत होते. नंतर उपचाराद्वारे त्यांचा हा आजार बराही झाला आणि त्यांनी अनेक नंतर हीट चित्रपटही दिले.

Dimple Kapadia Instagram


लग्नानंतर करिअरला निरोप दिला

स्टारडमच्या शिखरावर पोहोचताच, डिंपलने एक असा निर्णय घेतला ज्याने सर्वांनाच धक्का दिला. वयाच्या 15 व्या वर्षी तिने त्या काळातील सर्वात मोठा सुपरस्टार आणि तिचा क्रश, 30 वर्षीय राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले. डिंपल त्याची सर्वात मोठी चाहती होती आणि विमानात त्याला भेटल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर, तिने तिचे करिअर थांबवले आणि पूर्णपणे कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित केले. राजेश खन्ना आणि डिंपल यांना दोन मुली होत्या, ट्विंकल खन्ना आणि रिंकू खन्ना.

पतीपासून वेगळं झाल्यानंतर धमाकेदार पुनरागमन केलं

काळानुसार सगळं बदलू लागलं. राजेश खन्ना यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. डिंपल आणि राजेश यांचे नाते तुटले. अखेर डिंपल तिच्या दोन्ही मुलींसह वेगळी झाल्या आणि राजेश खन्ना त्याच्या बंगल्यात एकटेच राहू लागले. पण डिंपल इथेच थांबली नाही. वयाच्या 25 व्या वर्षी तिने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणं सुरु केलं. त्यांनी धमाकेदार पुनरागमन केलं. ऋषी कपूरसोबतचा त्यांचा ‘सागर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. डिंपलचे स्टारडम पुन्हा एकदा परतलं होतं.

अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय

लहान वयात स्टारडम मिळवणे, आजाराशी झुंजणे, लग्नानंतर करिअर सोडून देणे आणि नंतर इतक्या ताकदीने पुनरागमन करणे. हे सर्व डिंपल कपाडियाला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे बनवले. ‘सागर’ नंतर त्यांना अनेक हिट चित्रपट दिले आणि अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.