Dipika kakar : दीपिका कक्कर पुन्हा हॉस्पिटलमध्ये, पती शोएब यांनी दिले हेल्थ अपडेट, सांगितले की…

दीपिका कक्कर हिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये, तिने तिच्या तब्येतीबद्दल अपडेट दिले आहेत. दीपिका हिच्यासोबतच तिचा पती शोएब याने त्याच्या मुलगा रुहान याच्याबद्दल सांगितले आहे.

Dipika kakar : दीपिका कक्कर पुन्हा हॉस्पिटलमध्ये, पती शोएब यांनी दिले हेल्थ अपडेट, सांगितले की...
Dipika Kakar
| Updated on: Jul 07, 2026 | 7:22 PM

अभिनेत्री दीपिका कक्कर ( Dipika Kakar )  हिने तिला स्टेज – २ चा लिव्हर कॅन्सर असल्याचे गेल्यावर्षी मे महिन्यात सांगितले होते. तेव्हापासून ती आणि तिचा पती शोएब इब्राहिम संकटातून जात आहेत. जून २०२६ या कपलने जाहीर केले होते की लिव्हरमध्ये दोन नवीन गाठी आढळल्यानंतर दीपिका हीचे इम्युनोथेरपी सेशन सुरु केले होते. आपल्या ताज्या व्हिडीओ संभाषणात अभिनेता शोएब याने दीपिकाला हॉस्पिटलच्याच बेडवर ठेवल्याचे दाखवले होते. इन्फ्युजन थेरेपी सुरु असताना ती थकलेली आणि अवसान गळालेली दिसली. त्याने आपल्याला हॉस्पिटलला वारंवार जावे लागत असल्याने त्याचा मुलगा रुहान याच्यावर काय परिणाम होत आहे हे देखील त्याने या व्हिडीओत स्पष्ट केले आहे.

दीपिका कक्कड हीचे इन्फ्यूजन

दीपिका हीच्या आरोग्याची अपडेट देताना शोएब याने सांगितले, तेव्हा काही गोष्टींवर उघड झाल्या होत्या. गेल्यावेळी तिची आयर्नची पातळी थोडी कमी झाली. यामुळे तिला IV द्वारे आयर्न दिले जात होते.यानंतर तो म्हणाला की आम्ही दीड – दोन तासांत घरी जाऊ. आपल्या चाहत्यांना दिलासा देताना दीपिकाने सांगितले की, ‘सर्व काही ठीक आहे. मला आधी चक्कर आल्यासारखे वाटत होते. कारण त्यांनी मला एक प्री मेडिकेशन दिले होते. त्यामुळे झोप येते. एवढंच बाकी सर्व ठीक आहे.’

केवळ दीपिका, दीपिका , दीपिकाच

शोएब याने पुढे सांगितले की गेल्यावेळी आम्हाला पूर्ण रात्रीसाठी एडमिट व्हायला लागले. परंतू यावेळी आम्ही यास डे-केअर प्रोसजर म्हणून करत आहोत. म्हणजे रात्री आम्ही रुहानच्या जवळ घरी जाऊ शकतो. आता हे दर २० ते २१ दिवसांनी होणारे रुटीन बनले आहे. मुलगा रुहानच्या संदर्भात बोलताना शोएब याने सांगितले की तो आजकाल जरा चिडचिडपणा करतोय. जस जसा तो मोठा होत आहे, तसा तो दीपिकाशी जास्त कम्फर्टेबल होत आहे. खास करुन गेल्या एक महिन्यांपासून कारण मी घरी नव्हतो. पापा घरी नव्हते आणि देव भैया देखील तेथे नव्हते. केवळ दीपिका, दीपिका , दीपिकाच आहे.”

येथे व्हिडीओ पाहा –

Follow Us