Breaking News : दिशा सालियनचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर, धक्कादायक माहिती उघड

दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पोस्टमॉर्टम अहवालात डोक्याला गंभीर दुखापत आणि शरीरावर इतर जखमा आढळल्या आहेत.

Breaking News : दिशा सालियनचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर, धक्कादायक माहिती उघड
Disha Salian
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2025 | 7:59 PM

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूवरुन सध्या राजकारण तापलं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतल्याने याप्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच या याचिकेत दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दिशा सालियनप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियनच्या पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला आहे.

पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी दिशाने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. यानंतर आता तिचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

धक्कादायक बाबी उघड

दिशा सालियनच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या शरीरावरही जखमा असल्याची नोंद या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. दिशा सालियनच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झाला होता. तसेच तिच्या डोक्याला गंभीर इजाही झाली होती. दिशाच्या शरीरावर जखमा असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या हातावर, पायावर आणि छातीजवळ जखमा असल्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

दोन दिवसांनी पोस्टमोर्टम

दिशा सालियनच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी म्हणजेच ११ जूनला करण्यात आले होते. तिच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम करण्यास उशीर का झाला, यावरुनही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तिच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम बोरिवलीतील पोस्टमोर्टम सेंटरमध्ये करण्यात आले होते.