
Bollywood Couple Divorce : झगमगत्या विश्वात कधी कोणाचा घटस्फोट होईल काहीही सांगता येत नाही. पण प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडप्याच्या घटस्फोटघचच्या चर्चा जरी रंगल्या तरी चाहत्यांना मोठा धक्का बसतो आणि सर्वत्र त्यांच्या रिलेशनशिप आणि घटस्फोटाची चर्चा सुरु होते. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये जितक्या लवकर नाती तयार होतात, तितक्याच लवकर तुटतात देखील… आता टीव्ही अभिनेत जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जय भानुशाली आणि माही विज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जय आणि माही परस्पर सहमतीने विभक्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी माही आणि जय यांच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र रंगली होती. ज्यामुळे चाहते देखील चकित झाले होते. तेव्हा रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर माही हिने प्रतिक्रिया देखील दिली होती. एका मुलाखतीत माहीने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं होतं…
अभिनेत्री म्हणाली, ‘जर आमचं घटस्फोट होतं आहे किंवा होऊ शकतं… यामध्ये लोकांना कशाला मी काही सांगू? तुम्ही माझे काका आहात की मी माझे वकील आहात… किंवा चांगल्या प्रकारे तुम्ही माझा घटस्फोट करुन देणार आहात… कोणत्या गोष्टीला एवढं मोठं करण्याची काय गरज आहे… तुम्ही विभक्त होणार आहात… तुम्ही घटस्फोट घेणार आहात…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या कमेंट सेक्शनमध्ये लोक लिहितात की, माही खूप चांगली आहे… जय वाईट आहे.. तर काही म्हणतात जय चांगला आहे, माही वाईट आहे… मला असं म्हणायचं आहे की, तुम्ही का जज करताय? आमच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? लोकांना वाटतं आता यांचा घटस्फोट होणार आहे तर, दोघे एकमेकांवर चिखल फेक करतील…’
‘मला असं वाटत समाजात याबद्दल प्रचंड दबाव आहे. मी फक्त एवढंच सांगेल ती लोकांना जगू द्या आणि तुम्ही पण जगा…’ असं देखील माही एका मुलाखतीत म्हणाली होती… माही आणि जय सध्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत.
माही विज आणि जय भानुशाली यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना एक मुलगी देखील आहे, जीचं नाव तारा असं आहे. सोशल मीडियावर दोघे मुलीसोबत कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.