AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा महिला 100 रुपयांत उपलब्ध…, वादग्रस्त टिप्पणीमुळे कंगना राणौत कायद्याच्या कचाट्यात

Kangana Ranaut : टिपण्णी कंगना यांना भोवली..., 'अशा महिला 100 रुपयांत उपलब्ध...', सर्वत्र अभिनेत्रीच्या टिपण्णीची चर्चा..., कंगना कायद्याच्या कचाट्यात, काय आहे संपूर्ण प्रकरण...

अशा महिला 100 रुपयांत उपलब्ध..., वादग्रस्त टिप्पणीमुळे कंगना राणौत कायद्याच्या कचाट्यात
फाईल फोटो
| Updated on: Oct 28, 2025 | 11:44 AM
Share

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी इथल्या भाजप खासदार कंगना राणौत 2020 – 21 च्या शेतकरी आंदोलना दरम्यान 82 वर्षीय महिला शेतकरी महिंदर कौर यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दलच्या मानहानीच्या खटल्यात कंगना राणौतला भटिंडा न्यायालयाने जामीन मंजूर केला. कंगना स्वतः तीन न्यायालयात हजर राहिल्या. आता याप्रकरणी पुढील सुनावणाी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जी स्पेशल कोर्टात होईल. न्यायालय परिसरात कंगना हिने माध्यामांशी बोलताना संपूर्ण प्रकरण फक्त एक गैरसमज आहे.. असं कंगना म्हणाल्या… मी फक्त एक रिट्विट केलं होतं, कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता… त्या ट्विटचा असा अर्थ काढण्यात येईल याचा मी स्वप्नात देखील विचार करु शकणार नाही… पंजाबची असो किंवा हिमाचलची.. माझ्यासाठी आदरणीय आहे… असं देखील कंगना म्हणाल्या…

मात्र, तक्रारदार महिंदर कौरचे वकील रघबीर सिंग बेहनीवाल यांनी कंगना यांचे दावे फेटाळून लावले. रघबीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ‘चुकून रिट्विट झालं आणि कोणावर निशाणा साधण्याचा कोणताच हेतू नव्हता… असं कंगना म्हणत आहेत. पण माझ्या क्लाएंटचे पती लभ सिंग यांनी सांगितल्यानुसार, कंगना यांनी यापूर्वी कधी माफी मागितली नाही… सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी वैयक्तिक उपस्थितीपासून कायमची सूट मिळावी यासाठी अर्ज केला होता, ज्याला आम्ही विरोध केला. लाभ सिंग म्हणाले, त्यांची पत्नी महिंदर कौर प्रकृती स्थिर नसल्यामुळे सुनावणीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. ‘

2021 मध्ये दाखल झाला दाखल

हे प्रकरण 2021 मध्ये दाखल झालं होतं… जेव्हा कंगना यांनी शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान बहादुरगड जांडियन गावातील महिंदर कौर यांचा फोटो शेअर केला आणि ‘अशा महिला 100 रुपयांत निषेधासाठी उपलब्ध आहेत…’ अशी टिप्पणी केली. यावर वातावरण पेटलं आणि महिंदर सिंग यांनी मानहानीचा खटला दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कंगनाची हजेरी घेण्यात आली. यापूर्वी, भटिंडा न्यायालय, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वैयक्तिक हजेरीपासून सूट आणि व्हर्चुअल सुनावणीसाठी त्यांचे अर्ज फेटाळले होते.

खटला रद्द करण्याची अभिनेत्री याचीका देखील फेटाळण्यात आली.. सुरक्षेच्या कारणास्तव, जिल्हा न्यायालय परिसराला उच्च सुरक्षा क्षेत्र घोषित करण्यात आले. अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आणि बॅरिकेड्स उभारण्यात आले.

प्रकरणावर हरसिमरत कौर यांची प्रकिक्रिया

भटिंडातील शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी महिंदर कौर यांचं अभिनंदन केलं. ‘मी महिंदर यांचे आभार व्यक्त करते. ज्यांनी घमंडी महिला (कंगना) यांना धडा शिकवला आणि पंजाब येथील माता, बहिणी आणि मुलींच्या सन्मानाचा आदर केला. त्यांनी मोठं धाडस दाखवलं आहे. या वयात त्या कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. आम्हाला विश्वास आहे, कायदा कंगना यांनी मानहानीकारक आणि अपमानजनक टिपण्णीसाठी जबाबदार ठरवेल…’v

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.