Divyanka Tripathi: दिवाळीच्या रात्री दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला भीषण आग; थोडक्यात बचावली अभिनेत्री, पण गमावली ही व्यक्ती

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी अलीकडेच आपल्या मुलांची नावे दैविक आणि वैद्विक अशी असल्याचं जाहीर केलं होतं. आता या चिमुकल्यांच्या जन्मानंतर त्यांना आशीर्वाद देणाऱ्या धनपत अंकल यांचे निधन झाल्याने दिव्यांका आणि विवेक भावूक झाले आहेत.

Divyanka Tripathi: दिवाळीच्या रात्री दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला भीषण आग; थोडक्यात बचावली अभिनेत्री, पण गमावली ही व्यक्ती
दिव्यांका त्रिपाठी
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2026 | 3:10 PM

Divyanka Tripathi: टेलिव्हिजन मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिच्यावर दिवाळीच्या आनंदात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीच्या आदल्या रात्री मुंबईतील तिच्या निवासी इमारतीला भीषण आग लागली. यावेळी दिव्यांका, तिचा पती विवेक दहिया, त्यांची जुळी मुलं, कुटुंबीय आणि घरातील कर्मचारी इमारतीतच होते. सुदैवाने वेळीच धोका लक्षात आल्याने सर्वांनी सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यश मिळवलं. मात्र, या दुर्घटनेत इमारतीचे सुरक्षारक्षक धनपत अंकल यांचा मृत्यू झाला. या घटनेनं दिव्यांका आणि विवेक यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिव्यांका त्रिपाठीने 10 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर आगीचे काही व्हिडीओ शेअर करत संपूर्ण घटनेची माहिती दिली.

7 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या आदल्या रात्री आणि पती विवेकच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडली. त्या दिवशी कुटुंबीयांनी बाहेर जाण्याचा बेत आखला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा प्लॅन सतत पुढे ढकलला जात होता. त्यामुळे ते घरीच होते. आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी आपल्या लहान बाळांना, कुटुंबीयांना आणि कर्मचाऱ्यांना घेऊन तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. सुरुवातीला या दुर्घटनेतून केवळ जीवितहानी न होता बाहेर पडल्याचा दिलासा कुटुंबाला होता. मात्र, काही वेळाने इमारतीचे सुरक्षारक्षक धनपत अंकल यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Loading...

दिव्यांकाने शेअर केला व्हिडीओ

दिव्यांकाने तिच्या पोस्टमध्ये धनपत अंकल यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. ती म्हणाली की, जेव्हा आम्ही आमच्या जुळ्या मुलांना पहिल्यांदा घरी आणलं, तेव्हा त्यांचं स्वागत आणि आशीर्वाद देणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी धनपत अंकल होते. ते केवळ इमारतीचे सुरक्षारक्षक नव्हते, तर आमच्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांच्यावर आमचा विश्वास होता. आमची मुलं मोठी होताना ते त्यांच्यासोबत असतील, त्यांच्याशी खेळतील, अशा अनेक आठवणींची आम्ही कल्पना केली होती. मात्र, आता हे सर्व केवळ स्वप्नच राहिलं, अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.

‘काही नुकसान आपल्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण करून जातात, जी कधीच भरून निघत नाही,’ अशा भावनिक शब्दांत दिव्यांकाने पोस्टची सुरुवात केली. धनपत अंकल यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर ती आणि विवेक यांना त्यावर विश्वासच बसत नव्हता. मित्राच्या घरी आश्रय घेतल्यानंतरही ही बातमी खोटी असावी, अशीच प्रार्थना ते करत होते. दिवाळीच्या दिवशी इमारतीचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत झाला. त्यानंतर सुरक्षेची तपासणी करून गॅसपुरवठा आणि लिफ्टही सुरू करण्यात आली. मात्र, घरातील दिवे पुन्हा लागले असले तरी एका अनमोल व्यक्तीला गमावल्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही, असं दिव्यांकाने म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us